Money Heist 5 Final Release Time: नेटफ्लिक्सवर किती वाजता रिलीज होणार ‘मनी हाइस्ट ५’ चा शेवटचा एपिसोड?

Money Heist 5 Final Release Time: नेटफ्लिक्सवर किती वाजता रिलीज होणार ‘मनी हाइस्ट ५’ चा शेवटचा एपिसोड?

Money Heist 5 Final Release Time: नेटफ्लिक्सवर किती वाजता रिलीज होणार 'मनी हाइस्ट ५' चा शेवटचा एपिसोड? जाणून घ्या

जगभरातील मनी हाइस्टच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे कारण मनी हाइस्टच्या पाचव्या सीझनचा शेवटचा एपिसोड आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनी हाइस्टच्या ५ सीझनच्या शेवटच्या एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. गुरुवारी रात्री उशिरा नेटफ्लिक्सने ट्विट करत शेवटचा एपिसोड आज म्हणजेच ३ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता प्रोफेसर आणि त्यांची संपूर्ण टीमचं काय झाल? बँक ऑफ स्पेनमधून सोन चोरी करण्यात ते यशस्वी झाले की स्पेशल फोर्सच्या निशाण्यावर आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटचा एपिसोड पाहिल्यानंतर मिळणार आहे.

मनी हाइस्टच्या ५व्या सीझनचा शेवटचा एपिसोड आज ३ डिसेंबरला दुपारी दीड वाजता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाणार आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत ट्विट हँडलवरुन ही घोषणा केली. तुमचं पासबुक मार्क करुन ठेवा कारण आपण बँक ऑफ स्पेनला जात आहोत मनी हाइस्टचा शेवटचा एपिसोड उद्या दीड वाजता येतोय, असे म्हटले आहे. नेटफ्लिक्सच्या पोस्टनंतर मनी हाइस्टचे चाहते भलतेच खुश झाले आहेत.

मनी हाइस्टचा पाचवा सीझन दोन भागांमध्ये विभागला गेला. पहिल्या भागात पाच एपिसोड्स आणि शेवटच्या भागात पाच एपिसोड पाहता येणार आहे. पहिला भाग ३ सप्टेंबरला रिलीज झाला होता. ज्यात प्रोफेसर आणि त्यांची संपूर्ण टीम बँक ऑफ स्पेनमध्ये आहेत. आतापर्यंत पडद्यामागून खेळ खेळणाऱ्या प्रोफेसरांना फायनल एपिसोडमध्ये बाहेर यावं लागणार आहे.

मनी हाइस्टचा चौथा सीझन २०२०मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात ८ एपिसोड्स होते. मुळ स्पॅनिश भाषेत असलेली मनी हाइस्ट वेब सीरिजचे पहिले चार सीझन स्पॅनिश तसेच इंग्रजी,हिंदी,तमिळ आणि तेलुगू भाषेत उपलब्ध आहेत. आता पाचव्या सीझनचा शेवटच्या एपिसोडमध्ये कोणता नवीन धमाका होणार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत.


हेही वाचा – Tarak Mehtaचा युट्यूब धुमाकूळ! २०२१च्या टॉप १० व्हिडिओमध्ये ‘या’ एपिसोडचा समावेश

First Published on: December 3, 2021 11:06 AM
Exit mobile version