घरताज्या घडामोडीTarak Mehtaचा युट्यूब धुमाकूळ! २०२१च्या टॉप १० व्हिडिओमध्ये 'या' एपिसोडचा समावेश

Tarak Mehtaचा युट्यूब धुमाकूळ! २०२१च्या टॉप १० व्हिडिओमध्ये ‘या’ एपिसोडचा समावेश

Subscribe

टेलिव्हिजनला हा एपिसोड प्रदर्शित होऊन अनेक दिवस झालेत. मात्र हा एपिसोड युट्यूबर लाखो वेळा पाहिला जातोय.

मागच्या १३ वर्षांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. प्रेक्षकांना हसवणारा हा शो त्याच्या जबरदस्त कंटेंटमुळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. गेली अनेक वर्ष तारक मेहता पाहणारा एक चाहता वर्ग आजही तितक्याच आवडीने तारक मेहता पाहताना दिसतो. केवळ भारतातच नाही तर जगभरात या शोची ख्याती आहे. टेलिव्हिजनच नाही तर सोशल मीडियावर देखील तारक मेहता का उल्टा चश्मा शोचे एपिसोड प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहत असतात. याच तारक मेहता शोने युट्यूबवर धुमाकूळ घालत २०२१ च्या टॉप १० व्हिडिओमध्ये समावेश केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, २०२१च्या टॉप १० व्हिडिओजची लिस्ट समोर आली आहे. ज्यात सोशल मीडियावर सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला व्हिडिओ म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा या शोचा एक एपिसोड आहे. शोचे प्रसिद्ध अभिनेते आत्माराम भिडे यांच्यावर हा एपिसोड आहे. टेलिव्हिजनला हा एपिसोड प्रदर्शित होऊन अनेक दिवस झालेत. मात्र हा एपिसोड युट्यूबर लाखो वेळा पाहिला जातोय.

- Advertisement -

काय आहे तो एपिसोड?

युट्यूबवर टॉप १०मध्ये असलेल्या व्हिडिओत आत्माराम भिडे यांच्यावर आधारित आहे. आत्मराम भिडे यांची रात्री सायकल चोरीला जाते. आत्माराम आपल्या सखारामसाठी जेठालालला मारण्यासाठी त्याच्या बालकनीतून उडी मारतो हे दाखवण्यात आलं आहे. या एपिसोडला नेटकऱ्यांनी चांगलच डोक्यावर घेतलं आहे. या खास एपिसोडला युट्यूबवर आता पर्यंत १० करोडहून अधिक व्यूज आणि लाखो शेअर्स लाईक्स मिळाले आहेत.
शोचा हा ट्रेडिंग एपिसोड ९ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता.

तारक मेहताच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये भिडे चुकून माधवीला तिच्या भावाने दिलेली साडी जाळतो. माधवी साडी नेसून तिच्या भावाचं स्वागत करण्यासाठी जाणार असते मात्र भिडेंच्या एका चुकीमुळे माधवीचा सगळ्या प्लॅन फ्लॉप होतो.

- Advertisement -

हेही वाचा – Ileana Dcruz: मालदिवमध्ये इलियानाचा हॉट अंदाज

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -