करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना’ नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना’ नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

janhvi kapoor

गेले काही दिवस बॉलिवूडच्या अनेक निर्मातांनी आपला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यात आता आणखी एका चित्रपटाची भर झाली आहे. चित्रपट निर्माता करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.  ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘विमान मुलाने उडवले किंवा मुलीने उडवले त्या दोघांनाही वैमानिकच म्हणतात. गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे’ असे नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार हे सांगितलेलं नाहीये.

कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांच्या साहसाची गाथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. पहिल्यांदा जान्हवी एका धाडसी महिलेची भूमिका साकारणार असून तिला या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल या चित्रपटात जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. अंगद चित्रपटात जान्हवीच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे.


हे ही वाचा – कोरोनापासून वाचण्यासाठी माऊथवॉश, ‘असा’ करा वापर!


 

First Published on: June 9, 2020 5:55 PM
Exit mobile version