घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोनापासून वाचण्यासाठी माऊथवॉश, 'असा' करा वापर!

कोरोनापासून वाचण्यासाठी माऊथवॉश, ‘असा’ करा वापर!

Subscribe

हा दावा कोरिया युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोरोनापासून बचाव होण्यासाठी प्रत्येकजण पुरेपुर काळजी घेत आहे. बाहेर जाताना मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, सॅनिटायझर सोबत ठेवणं या गोष्टी आवर्जून केल्या जात आहेत. मात्र शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून त्यांनी दावा केला आहे की, सॅनिटायझरप्रमाणे माऊथवॉशदेखील कोरोनाव्हायरसपासून बचाव करू शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानूसार, क्लोरहेक्सिडीन माऊथवॉश कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकतो.

लाळेमध्ये कोरोनाव्हायरस भरपूर प्रमाणात असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे. त्यामुळे एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती बोलत असेल तेव्हा तिच्या समोरच्या व्यक्तीपर्यंत कोरोनाव्हायरस पोहोचू शकतो. सध्या काही प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणंही दिसत नाहीत. अशावेळी कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी माऊथवॉशची मदत होऊ शकते. हा दावा कोरिया युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. जर्नल ऑफ कोरियन मेडिकल सायन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

- Advertisement -

३० सेकंद करा गुळण्या

१० मिली क्लोरहेक्सिडीन माऊथवॉशने ३० सेकंद गुळण्या करणं फायदेशीर ठरलं. यामुळे लाळेतील व्हायरसचं प्रमाण २ तासांसाठी कमी होतं. ज्यामुळे व्हायरसच्या संक्रमणाचा धोका कमी होतो, असं शास्त्रज्ञांनी या अभ्यासात म्हटलं आहे.

दोन तासांनी करा माऊथवॉशचा वापर

डॉक्टर, रुग्ण, होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्ती, कामानिमित्त घराबाहेर पडणारे लोक आणि प्रवास करणाऱ्यांनी नागरिकांनी दर २ तासांनी या माऊथवॉशचा वापर केल्यास फायदा होईल. तसेच डेंटिस्ट,  ईएनटी,  ऑप्थमोलॉजी आणि जनरल फिजिशिअन्सनीदेखील त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना माऊथवॉशने गुळण्या करून येण्यास सांगावं. जेणेकरून किमान दोन तास तरी कोरोनाव्हायरस संक्रमणचा धोका कमी असेल, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – गोव्यात जाताय? तर मग आधी हे नवीन नियम वाचा!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -