सणासुदीचे दिवस असल्याने घरची आठवण येतेय – सोनाली बेंद्रे

सणासुदीचे दिवस असल्याने घरची आठवण येतेय – सोनाली बेंद्रे

अभिनेत्री सोनाली बेंद्रे

हिंदी आणि मरठी सिनेसृष्टी मधील अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सर या आजारावर उपचार घेत आहे. मात्र सध्या सणासुदीचे दिवस असल्याने तिला घरची खूप आठवण येत असल्याचे तिने सोशल मिडियावर सांगत तिने आपले मन चाहत्यांकडे व्यक्त केले आहे. तिला घरची खूप आठवण येत असल्याने ती प्रचंड भावूक झाल्याचे या पोस्टमधून पाहायला मिळत आहे. गणपतीच्या सणामुळे सोनाली प्रचंड भावूक झाल्याचे तिने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमधून दिसून येत आहे.

काय म्हणाली सोनाली?

सध्या सणासुधीच दिवस चालू असल्याने मला घरची फार आठवण येत आहे. गणेशोत्सव माझ्यासाठी नेहमीच खास राहिला आहे. मी घरचे गणपतीचे सेलिब्रेशन खूप मिस करत आहे. पण सर्वांना बाप्पाचे आशीर्वाद मिळत आहेत, यातच मी खूश असल्याचे देखील तिने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिने या आठवणीसोबत तिचा मुलगा रणवीर याचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

वाचासोनाली बेंद्रेचा बाल्ड इज ब्युटिफूल लुक

वाचा – नव्या आशेसह सोनाली बेंद्रेचा नवा लुक

वाचा अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सर

वाचा – सोनालीच्या आठवणीने विवेकला कोसळले रडू

First Published on: September 15, 2018 11:43 AM
Exit mobile version