घरमनोरंजननव्या आशेसह सोनाली बेंद्रेचा नवा लुक

नव्या आशेसह सोनाली बेंद्रेचा नवा लुक

Subscribe

नव्या आशेसह सोनाली बेंद्रेनं कॅन्सरशी लढा द्यायचं ठरवलं असून तिनं आपले लांबसडक केस कापले आहेत. तिचा हा नवा लुकदेखील तिला चांगला दिसत आहे.

कॅन्सर झाला हे समजल्यानंतर बऱ्याचदा माणसं हतबल होतात किंवा निराशावादी होतात. पण या सगळ्याला मात देत सोनाली बेंद्रेनं एक नवा आदर्शच सगळ्यांसमोर ठेवला आहे. गेल्याच आठवड्यात सोनाली बेंद्रेला हायग्रेड कॅन्सर असल्याचं तिनं आपल्या इन्स्टाग्रामवरून स्टेटमेंट देऊन पोस्ट केलं होतं. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मात्र मंगळवारी, तिनं आपला नवा व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नवा हेअरकट करत असल्याचा व्हिडिओ सोनालीनं ट्विट केला आहे.

लांबसडक केस टाकले कापून

सोनालीचे केस पूर्वीपासूनच लांबसडक होते. मात्र या व्हिडिओमध्ये सोनीलीनं आपले केस अगदीच लहान केल्याचं दिसत आहे. या नव्या लुकमध्येदेखील सोनाली तितकीच फ्रेश आणि सुंदर दिसत आहे. कॅन्सर झाल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावरची सकारात्मकता या व्हिडिओमध्ये चाहत्यांना बघायला मिळते आहे. #SwitchOnTheSunshine असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यातूनच ती कॅन्सरशी अगदी सकारात्मक तऱ्हेने लढा देत असल्याचं स्पष्ट होत आहे. तिच्याबरोबर तिचे पती गोल्डी बेहलदेखील या व्हिडिओमध्ये दिसत असून त्यांचा तिला पूर्ण पाठिंबा असल्याचं जाणवत आहे. शिवाय तिनं आपल्या इन्स्टावर या नव्या लुकचा फोटो पोस्ट केला असून एक मोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये आपल्यावर जोपर्यंत कोणतं संकट येत नाही तोपर्यंत आपल्यात किती सहनशक्ती आहे याची कल्पना येत नाही असं तिनं म्हटलं आहे. लोकांनी आपल्या कॅन्सरसंबंधित गोष्टी सांगून आपल्याला अजून प्रेरित केलं असून धैर्यानं जगण्यासाठी बळ दिलं आहे, असंही तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कॅन्सरशी लढण्याचा माझा हा मार्ग आहे असं तिनं स्पष्ट केलं आहे. लोकांकडून मिळत असलेल्या प्रेम आणि प्रार्थनेबद्दलदेखील तिनं आभार मानले आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

In the words of my favourite author Isabel Allende, “We don’t even know how strong we are until we are forced to bring that hidden strength forward. In times of tragedy, of war, of necessity, people do amazing things. The human capacity for survival and renewal is awesome.” The outpouring of love I’ve received in the last few days has been so overwhelming… and I’m especially grateful to those of you who shared stories of your experiences in dealing with cancer, whether it was your own or of loved ones. Your stories have given me an extra dosage of strength and courage, and more importantly, the knowledge that I’m not alone. Each day comes with its own challenges and victories and so for now, I’m taking this #OneDayAtATime. The only thing I’m trying to be consistent about is maintaining a positive outlook… literally #SwitchOnTheSunshine – it’s my way of dealing with this. Sharing my journey is also part of this process… I can only hope it reminds you that all is not lost and that someone, somewhere understands what you’re going through. ??

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -