घरमनोरंजनसोनालीच्या आठवणीने विवेकला कोसळले रडू

सोनालीच्या आठवणीने विवेकला कोसळले रडू

Subscribe

विवेक ओबेरॉयला एक अॅक्ट बघितल्यानंतर सोनाली बेंद्रेच्या आठवणीने सेटवरच रडू कोसळले. सोनाली सध्या कॅन्सरला झुंज देत आहे.

जुलै महिन्यात आपल्याला हायग्रेड कॅन्सर झाल्याचं सोनाली बेंद्रेनं सांगितल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. त्यावेळी सोनालीनं नुकताच ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’मध्ये विवेक ओबेरॉय आणि उमंग कुमार बरोबर शो ची परीक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. कॅन्सर असल्याचं कळल्यानंतर हा शो सोनालीनं मध्यावरच सोडला आणि ती उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाली. या शो मध्ये विवेक नुकताच सोनालीच्या आठवणीने रडल्याचा पहायला मिळालं आहे.

काय घडलं?

‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रियालिटी शो मध्ये एक मुलगी कॅन्सर रूग्णाची भूमिका साकारत होती. हा अॅक्ट बघून विवेक सोनालीच्या आठवणीने रडायला लागला. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ हा तिसरा सीझन असून विवेक आणि सोनाली पहिल्या दोन्ही सीझनमध्येदेखील परीक्षक होते. त्यामुळं या दोघांमध्येही खूपच चांगली मैत्री आहे. त्यामुळं सोनालीच्या आठवणीने विवेक गहिवरला. त्यामुळं शो मध्येदेखील विवेक सोनालीची खूप वेळा आठवण काढतो. दरम्यान उमंगनेही आपल्याला सोनालीची खूप आठवण येत असल्याचं सांगितलं आहे. ती पुन्हा परत असल्याचा विश्वासही त्याने दर्शवला आहे. या शो च्या फिनालेपर्यंत ती नक्की परत येईल असं उमंगनं म्हटलं आहे.

- Advertisement -

सध्या सोनालीचं कुटुंब तिच्यासोबत

सोनाली सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. तिच्या या आजारामध्ये तिचा नवरा गोल्डी बेहल, तिचा मुलगा रणबीर, तसंच तिच्या दोन्ही जवळच्या मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री जोशी ओबेरॉय या सतत तिच्याबरोबर आहेत. मागच्या आठवड्यात या दोघींनी तिच्याबरोबर फ्रेंडशिप डेदेखील साजरा केला होता. ज्याचे फोटो व्हायरल झाले होते. तर सोनाली आपल्या आजाराकडे खूपच सकारात्मक तऱ्हेने पाहात असून पुन्हा एकदा नव्याने उभी राहत असल्याचं तिच्या चाहत्यांना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -