‘मराठी चित्रपटांचे प्रेक्षक कुठे आहेत? ते तर दाक्षिणात्य चित्रपट पाहतात’, महेश मांजरेकरांचं वक्तव्य

‘मराठी चित्रपटांचे प्रेक्षक कुठे आहेत? ते तर दाक्षिणात्य चित्रपट पाहतात’, महेश मांजरेकरांचं वक्तव्य

मराठी चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते आणि दिगदर्शक महेश मांजरेकर9mahesh manjrekar) यांचे सगळेच चित्रपट विविध विषयांवर आधारित असतात. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का'(de dhakka) हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. मकरंद अनासपुरे(makarand anaspure), शिवाजी साटम आणि सिद्धार्थ जाधव(siddharth jadhav) या तीन मात्तबर कलाकारांना घेऊन महेश मांजरेकरांनी दे धक्का सारखा उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेला ‘दे धक्का २'(de dhakka – 2) हा नवा चित्रपट आज शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात प्रेक्षसकांसाठी भेटीला आला आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपटांविषयी भाष्य केलं आहे.

हे ही वाचा –  ‘तू एकच फोटो वारंवार पोस्ट केलास’… प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्याची भन्नाट कमेंट

सध्या अनेक विषयांवर मराठी चित्रपट येत आहेत. मराठी चित्रपटांमध्ये वेगळे विषय उत्तम कलात्मक पद्धतीने हाताळले जातात. मराठी चित्रपट सुद्धा वेगवेगळ्या जाणार मध्ये येत आहेत. पण हेच मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपट गुहांमध्ये जातात का ? याच संदर्भांत अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका कार्यक्रम वक्तव्य केलं आहे.

‘मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चांगले चित्रपट प्रदर्शित होत नाहीत असं खायचं नाही. पण प्रेक्षक कुठे आहेत? तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण ते मत मांडण्यापूर्वी एकदा तरी चित्रपट पाहा. मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहण्यासारखे नसतात हे प्रेक्षकांनीठरवूनच ठेवलं आहे. निर्माते आणि दिग्दर्शक वेगवेगळ्या कथा आणि विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू पाहतात त्यांच्यासाठी खरंच हे अतिशय वेदनादायी आहे.” असं महेश मांजरेकर म्हणाले.

हे ही वाचा – इमोशनल, कॉमेडी, भन्नाट डायलॉग असा मनोरंजनाचा फुल टू पॅकेज असणारा ‘दे धक्का 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

त्याचबरोबर महेश मांजरेकर पुढे असंही म्हणाले, ‘पण तेच प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यासाठी आनंदाने चित्रपट गृहांमध्ये जातात. या चित्रपटांना जे यश मिळतं त्या बद्दल माझं काहीच म्हणणं नाही. काही चित्रपट चांगल्या आशयाचे नसतानाही दक्शिणात्य चित्रपटांचे निर्माते त्यांच्या चित्रपटांची उत्तम जाहिरात करत चांगले पैसे कमावतात.’ प्रेक्षक मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गुहांमध्ये जात नाहीत अशी खंत व्यक्त करत महेश मांजरेकरांनी वक्तव्य केलं.

हे ही वाचा – महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार सावरकरांची भूमिका

First Published on: August 5, 2022 12:36 PM
Exit mobile version