घरमनोरंजन'तू एकच फोटो वारंवार पोस्ट केलास'... प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्याची भन्नाट कमेंट

‘तू एकच फोटो वारंवार पोस्ट केलास’… प्राजक्ता माळीच्या पोस्टवर चाहत्याची भन्नाट कमेंट

Subscribe

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत.

मराठी सिने सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीने(prajakta mali) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयासोबतच प्राजक्ताने निवेदिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर ‘प्राजक्त प्रभा'(prajakt prabha) का कविता संग्रह प्रकाशित करून एक कवयित्री म्हणूनही प्राजक्ता वाचकांसमोर आली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. प्राजक्ताच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘आजच्या ठळक बातम्या- माळी टाइम्स’; बातम्यांची प्रिंट असलेल्या साडीमुळे प्राजक्ता माळी ट्रोल

अभिनेत्री प्राजक्ता माळी(prajakta mali) गेल्या काही दिवसांपासून तिचे हटके फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. प्राजक्ता माळी ही नेहमीच वेगवेगळ्या लूक मध्ये दिसते. प्राजक्ताने गुलाबी साडीमधला तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि नेहमीप्रमाणेच प्राजक्ताने तिच्या खास अंदाजात त्या फोटोला एक हटके कॅप्शन सुद्धा दिले आहे. प्राजक्ता कविता करते. त्या प्रमाणे तिला जुन्या रेट्रो गाण्यांची आवड सुद्धा आहे. ‘बावरी सी तू फिरें । कौन है तेरा सजन…!’ रेट्रो गाण्याच्या ओळी लिहीत प्राजक्ताने फोटोला कॅप्शन दिले आहे. त्याचबरोबर ‘तळटीप लिहित उर्वरीत, नजर चूकीने राहिलेल्या फोटोंची सीरिज सुरू,’ असं सुद्धा प्राजक्ताने लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

- Advertisement -

हे ही वाचा – प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

प्रजातीचे सर्वच फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. प्राजक्ताने गुलाबी साडीतल्या पोस्ट केलेल्या फोटोवर एका चाहत्याने ‘खुप गोड दिसतेय प्राजु…! तू एकच फोटो वारंवार पोस्ट केलास तरी काही वाटणार नाही आम्हाला’. अशी कमेंट तिच्या चाहत्याने केली. ‘एवढ्या सुंदर साड्यांच्या अख्खीच्या अख्खी सीरिज पोस्ट करून आम्हाला जळवता आहात’, अशीहि कमेंट प्राजक्ताच्या(prajakta mali) फोटोवर आली आहेत.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -