महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार सावरकरांची भूमिका

२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी केली जाते. याचं दिवसाचे अवचित्य साधत महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे, चित्रपटाची घोषणा करत महेश मांजरेकरांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून, या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकरणारा अभिनेता रणदीर हुड्डा साकारणार असल्याची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

महेश मांजरेकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “सावरकरांबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळे विचार असू शकतात पण एक चित्रपट निर्माता म्हणून पण मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखा यात सावरकर जसे होते, यापेक्षा काही वेगळा फरक असणार नाही. मात्र ते एक स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना विसरता येणार नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

अभिनेता रणवीर हुड्डाने देखील चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडयावर शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिले की,”मला आशा आहे की एका खर्‍या क्रांतिकारकाची भूमिका करण्याचे आव्हान मी पेलू शकेन आणि त्यांची खरी कहाणी सांगू शकेन जी दीर्घकाळासाठी दडवून ठेवली गेली होती.” मात्र रणदीप हुड्डाच्या पहिल्या लुकचे सोशल मीडियावर जेवढे कौतुक होत आहे, तेवढेच ही भूमिका स्विकारल्याने त्याच्यावर टीका देखील केली जात आहे. सोशल मीडियावर रणदीपला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी ‘स्वातंत्र्यावीर सावरकर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे ‘स्वातंत्र्यावीर सावरकर’ चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.


हेही वाचा :‘Khatron Ke Khiladi 12’ मध्ये Rubina Dilaik पासून Jannat Zubair पर्यंत ‘या’ स्पर्धकाचा असणार सहभाग