Sunday, May 12, 2024
घरमानिनीFashionड्रेसनुसार घ्या 'अशा' प्रकाराच्या ओढण्या

ड्रेसनुसार घ्या ‘अशा’ प्रकाराच्या ओढण्या

Subscribe

सणासुदीला आणि प्रत्येक सणाला आपण ड्रेस खरेदी करतो. तसेच आपण ड्रेस नाही घेतला तर आपण ड्रेस पीस खरेदी करतो. अशावेळी आपण सर्वात आधी ड्रेसची ओढणी कशी आहे ते बघतो आणि मगच आपण ड्रेसची निवड करतो. बहुतेक वेळा ड्रेस छान नसला तरी चालतो पण त्याची ओढणी ही छान आणि सुटेबल असायला हवी. बाजारात अनेक प्रकारचे ओढण्याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि आपण त्यानुसारच आपल्या ड्रेसवर कोणती ओढणी शोभून दिसेल हे बघतो.

Kessi Present Odhani Dress Material Collection.

- Advertisement -

1. कॉटन सिम्पल ओढणी

जर का तुमचा ड्रेस सिम्पल असेल किंवा कॉटन कुर्ता किंवा ड्रेस असेल त्यावर तुम्ही कॉटनच्या ओढण्या ह्या घेऊ शकता. तसेच यामध्ये तुम्हाला हव्या त्या कॉन्ट्रासमध्ये या ओढण्या तुम्हाला उपलब्ध होईल.

2. सिल्क ओढणी

सिल्क मटेरियल ड्रेस हा पार्टीवेअर ड्रेसमध्ये जास्त निवडला जातो. सिल्क ड्रेस कार्यक्रमात जास्त शोभून दिसतो. सिल्कच्या अनेक व्हरायटी आपल्याला हव्या त्या रंगात आणि स्टाईलमध्ये बघायला मिळतात.

- Advertisement -

3. मल्टिकलर ओढणी

कधी कधी आपला ड्रेस हा वेगळा प्रकारचा असतो आणि आपल्याला हवी तशी ओढणी मिळत नाही. तर अशा वेळी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. ड्रेसमध्ये जो कोणता रंग असेल तशी मॅचिंग ओढणी तुम्ही घेऊ शकता. मल्टीकलर ड्रेसचा एक फायदा म्हणजे कोणत्याही रंगाची मिळती जुळती ओढणी त्यावर तुम्ही घेऊ शकता तसेच ही ओढणी दिसायला सुद्धा सुंदर दिसते.

4. बांधणी ओढणी

तुमचा ड्रेस जर का प्लॅन असेल तर त्यावर तुम्ही बांधणीची ओढणी स्टाईल करू शकता. बांधणी ओढणी घेताना तुमचा ड्रेस जरी का साधा असेल तरी चालेले पण त्यावरची ओढणी छान भरलेली हवी त्यामुळे त्याचा लूक उठून दिसेल.

5.रजवाडी ओढणी

राजस्थानी लेहेंग्यावर भरलेली ओढणी घ्यायची असेल तर रजवाडी ओढणी त्यावर ट्राय करा. तसेच रजवाडी ओढणी यामध्ये अनेक प्रकार आहेत. नवरात्रीमध्ये किंवा कधीही तुम्हाला ही ओढणी घ्यायची असेल तर त्यावरची डिझाइन्स आणि पॅटर्न बघून घ्या आणि मगच त्यानुसार तुम्हाला मॅचिंग करताना सोप्पे जाईल.

6. टिकल्यांची ओढणी

ड्रेस तुमचा सिम्पल किंवा जास्त भरलेला नसेल तर तुम्ही टिकल्यांची ओढणी त्यावर घेऊ शकता. तसेच टिकल्यांची ओढणी तुम्हाला हेवी लूक देईल. यामुळे तुमचा सिम्पल ड्रेस भरलेला दिसेल आणि यामुळे तुम्ही सुद्धा उठून दिसाल.

7.नेट ओढणी

नेटेड ड्रेसवर नेट ओढणी घेणे आवश्यक आहे. पण अनेकवेळा असे होते की नेटेड ड्रेसवर ओढणी खूप छोटी मिळते. त्यामुळे ड्रेस जरी चांगला असला तरी त्याचा पूर्ण लूक निघून जातो. अशावेळी तुम्हाला खास ड्रेसवर स्पेशल ओढणी घ्यावी लागते. तर मग अशा प्रकारची ओढणी घेताना ओढणी मोठी आहे का ? हे एकदा तपासून बघा.

8. एम्ब्रॉयडरी ओढणी

सिल्क आणि कॉटन अशा ड्रेस मटेरियलमध्ये एम्ब्रॉयडरी ओढणी बहुतेक वेळा वापरली जाते. तसेच एम्ब्रॉयडरी ओढणी घेताना तिचा कापड एकदा बघून घ्या.
एम्ब्रॉयडरीची फॅशन ही एव्हर ग्री फॅशन आहे. त्यामुळे एम्ब्रॉयडरी ओढणी ही कायम चर्चेत असणारी आणि महिलांना आवडणारी ओढणी आहे.

9. वेलवेटची ओढणी

अनेकवेळा आपण वेलवेटचा पटियाला हेवी ड्रेस घालतो. त्यावर वेलवेटची ओढणी देखील असते. पण त्या ओढणीला डिझाइन्स नसते. अशावेळी तुम्हाला हव्या त्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या ओढण्या देखील बाजारात उपलब्ध आहेत.

10. शिफॉनची ओढणी

जेव्हा आपण खादीचे ड्रेस घालतो किंवा कुर्ता घालतो. त्यावर शिफॉनची ओढणी घेतल्यावर मस्त एक लूक मिळतो. तसेच शिफॉनचाच ड्रेस तुम्ही घालणार असला तर त्यावर त्या प्रकारची ओढणी घेतली तर ती उठून दिसेल.


हेही वाचा : कांजीवरम साडी नेसताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

- Advertisment -

Manini