Sunday, April 28, 2024
घरमानिनीहिवाळ्यात बनवा पौष्टीक 'आल्याचा शिरा' अन् आजारांपासून रहा दूर

हिवाळ्यात बनवा पौष्टीक ‘आल्याचा शिरा’ अन् आजारांपासून रहा दूर

Subscribe

चहामध्ये आलं नसेल तर चहाची चव अपूरी वाटते. कारण आलं कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम करते. आलं केवळं पदार्थांची चवचं नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. विशेषत: हिवाळ्याच्या दिवसात आलं एका जालीम औषधाप्रमाणे काम करते. आल्यात शरीरातील इम्युनिटी सिस्टम बूस्ट करणारे अनेक घटक आहेत. आलं असं एक रामबाण औषध आहे ज्यामुळे थंडीत कोणत्याही औषधांपासून दूर राहता येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आल्यापासून तयार करता येणारी अशी एक रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं तोंडही गोड होईल आणि आरोग्यही हेल्दी राहील. जाणून घेऊन ही रेसिपी नेमकी कशी बनावयची…. (adrak ka halwa eat ginger halwa in winter season immunity will be boosted and diseases will remain aways)

आल्याचा शिरा बनव्यासाठी लागणारे साहित्य

1 ते 2 किलो आलं

- Advertisement -

1 कप गुळ

1 ते 2 कप बदाम

- Advertisement -

1 ते 2 कप काजू

20 मनुके

2 मोठे चमचे तूप

1 ते 4 कप अक्रोड

आल्याचा शिरा बनवण्याची कृती

१) आलं सोलून ते चांगलं धुवून घ्या. त्यानंतर त्याचे तुकडे करा.

२) यानंतर ब्लेंडरमध्ये टाकून पेस्ट बनवून घ्या.

३) ग्राइंडरमध्ये काजू, अक्रोड आणि बदाम यांचं मिश्रण बनवा, या मिश्रणाची एकदम बारीक पावडर बनवण्याची गरज नाही. या मिश्रणातील तुकडे चावताना जाणवले पाहिजे.

४) यानंतर एका पॅनमध्ये तूप गरम करा, यानंतर आल्याचं मिश्रण पॅनमध्ये टाकून ते चांगल्याप्रकारे तळा. हे मिश्रण 15 मिनिटांपर्यंत चांगले ढवळत रहा.

५) यानंतर मिश्रणात गुळ टाकून तेही चांगल्याप्रकारे मिक्स करा. गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर आता त्यात किशमिश आणि ड्रायफ्रूट्सचे केलेले तुकडे टाका, हे मिश्रण देखील 5 ते 6 मिनिटांपर्यंत ढवळत रहा.

६) सगळे पदार्थ टाकल्यानंतर आता संपूर्ण मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.

७) शिजल्यावर शिरा सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा, तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सने सजवा. आल्याचा शिरा आता खाण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे.


नातेसंबंधात पार्टनरला स्पेस देणं महत्वाचं आहे का?

- Advertisment -

Manini