जुगारासाठी स्वत:च्या घरात 70 लाखांची चोरी; वडिलांच्या तक्रारीनंतर मुलाला अटक

घरातल्या एक सदसस्यानी मित्राच्या मदतीने तब्बल 70 लाख चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्राची राजधानी नागपूरमध्ये ही घटना घडली. चोरीच्या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी याप्रकरणी 48 तासांत आरोपीचा शोध लावला.

घरातल्या एक सदसस्यानी मित्राच्या मदतीने तब्बल 70 लाख चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाराष्ट्राची राजधानी नागपूरमध्ये ही घटना घडली. चोरीच्या घटनेनंतर पोलिसात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी याप्रकरणी 48 तासांत आरोपीचा शोध लावला. सध्या या आरोपीची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. (young man stole 70 lakh from his own house in nagpur police arrested two accused)

नेमके प्रकरण काय?

नागपूर शहरातील शिंतीनगरमध्ये 2 दिवसांपूर्वी एका मुलाने स्वत:च्या घरात चोरी केली. संबंधीत मुलाने मित्राच्या साथीने ही चोरी केली. घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा अधिक तपास केला असता, त्याच्याच मुलाने हा मोठा प्रताप केल्याचे समोर आले. आपल्याचे मुलाने चोरी केली असल्याचे समजताच आरोपीच्या वडिलांना धक्का बसला.

दरम्यान, आरोपी मुलाला जुगार खेळण्याची सवय होती. गेल्या अनेक दिवसांपासून तो त्यासाठी वडिलांना पैसे मागत होता. परंतु, वडिलांनी पैसे द्यायला नकार दिल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने घरातच दरोडा टाकला. आणि घराच्या तिजोरीतून तब्बल 70 लाखांची रक्कम चोरली.

या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीनंतर नागपूरच्या क्राईम ब्रांचने या प्रकरणाची चौकशी करत 48 तासांच्या आत 2 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून नागपूर पोलिसांनी 13 लाखांची रोकड आणि 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


हेही वाचा – संजय राऊतांच्या अडचणी काही संपेना! ‘या’ दिवशी होणार आता जामिनावर सुनावणी