Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health आठवड्यातून एकदा तरी खा कारले; आहेत जबरदस्त फायदे

आठवड्यातून एकदा तरी खा कारले; आहेत जबरदस्त फायदे

Subscribe

शरीर नेहमी सुदृढ ठेवण्यासाठी डॉक्टर हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या भाज्या केवळ शरीर निरोगीच नाही तर अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठी देखील मदत करतात. भारतातीय लोक अनेक विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचे सेवन करतात. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या विविध चवीच्या भाज्या आहेत. पण या सर्व भाज्यांमध्ये एकच भाजी अशी आहे जिचं नाव घेतल्यावरही अनेकजण नाक-तोंड मुरडतात.

6 Benefits of Bitter Melon (Bitter Gourd) and Its Extract

- Advertisement -

अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली कारल्याची भाजी अनेकांची नावडती भाजी आहे. खूप कमी लोक आहेत ज्यांना कारल्याची भाजी खायला आवडते. पण तुम्हाला ठाऊक आहे का कारल्याची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. कारल्याच्या भाजीचे सेवन शरीरातील घाण बाहेर काढण्यास मदत करते.

कारले खाण्याचे फायदे

5 Health benefits of KARELA (bitter gourd), and why it must be part of your diet

  • रक्तातील साखर नियंत्रणात राहते

मधुमेहाच्या व्यक्तींसाठी कारलं खाणं फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे डॉक्टर नेहमी कारलं खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये तुम्ही कारल्याचं रस किंवा कारल्याच्या भाजीचे सेवन करु शकता.

  • पचनक्रिया सुधारते
- Advertisement -

कारल्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत राहते.

Karela Fry: This Crispy-Bitter South Indian Recipe Is A Must-Try

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, कारल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. यामुळे विविध आजारांपासून आपला बचाव होतो.

  • वजन नियंत्रणात ठेवण्याचे

दररोज कारल्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

  • डिटॉक्सिफिकेशन

कारल्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि बायोएक्टिव्ह कंपाऊंड्समुळे शरीराला डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते.


हेही वाचा :

तुमच्या ब्लड ग्रुपनुसार निवडा योग्य आहार

- Advertisment -

Manini