चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी अन्यथा आरोग्यास होईल हानी

चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी अन्यथा आरोग्यास होईल हानी

बऱ्याच जणांची सकाळ ही चहा आणि कॉफीच्या सेवनाने होते. संपूर्ण दिवस Active राहण्यासाठी सकाळचा एक कप चहा फार महत्त्वाचा असतो. पण, केवळ चहाच नाहीतर त्या चहासोबत काहीतरी चटपटीत खाण्याचीही बऱ्याच जणांना सवय असते. तर काही व्यक्ती चहासोबत बिस्कीट खातात. तर काही जण चमचमीत आणि तळलेले पदार्थ खातात. पण, चहासोबत असे काही पदार्थ चुकून खाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो ते पदार्थ खाणे टाळावे. पण, ते नेमके पदार्थ कोणते आहेत. जाणून घेऊया.

बेसनयुक्त पदार्थ

बऱ्याच जणांना गरमागरम चहासोबत अनेक चटपटीत आणि खमंग पदार्थ खाण्याची सवय असते. उदारणार्थ कांदा भजी, चण्याचा पोळा आणि बरच काही. परंतु, हे बेसनयुक्त पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक असतात. बेसनयुक्त पदार्थ चहासोबत खाल्ल्याने पाचक शक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते.

हळदीयुक्त वस्तूंचे सेवन करु नये

चहाचे सेवन करताना किंवा चहा प्यायल्यानंतर हळदीच्या पदार्थांचे सेवन करु नये. उदारणार्थ थालीपीठ, बटाटा भजी आणि वडापाव. या पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करु नये. कारण चहा आणि हळदीमधील रासायनिक घटक एकत्र येऊन पाचन शक्तीवर परिणाम करतात. त्यामुळे त्याचा पोटावर परिणाम होतो.

आंबट पदार्थ खाणे टाळावे

बऱ्याच जणांना लेमन टी आवडते. त्यामुळे अनेक जण ब्लॅक टीमध्ये लेमन घालून त्याचे सेवन करतात. मात्र, हे मिश्रण शरीरासाठी फार धोकादायक असते. तसेच चहासोबत अनेक जण ऑमलेट पाव, अंडी याचेही सेवन करतात. तेही आरोग्यासाठी धोकादायक असते.

चहानंतर पाणी पिऊ नये

बरेच जण चहानंतर पाण्याचे सेवन करतात. मात्र, चहानंतर पाण्याचे सेवन करु नये. यामुळे अरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे चहाचे सेवन करण्यापूर्वी पाणी प्यावे. कारण चहा प्यायल्यानंतर पाण्याचे सेवन केल्यास पोटात अनेक समस्या उद्भवतात. तसेच चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.

कच्च्या पदार्थांचे सेवन करु नये

चहासोबत कच्च्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. उदारणार्थ सॅलड. यामुळे आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात.


हेही वाचा – कोरोनात प्रतिकार शक्ती वाढवणारी पपई झाली महाग! पपईचे गुणधर्म ‘या’ ४ फळांमध्येही


 

First Published on: May 25, 2021 11:04 AM
Exit mobile version