घरताज्या घडामोडीकोरोनात प्रतिकार शक्ती वाढवणारी पपई झाली महाग! पपईचे गुणधर्म 'या' ४ फळांमध्येही

कोरोनात प्रतिकार शक्ती वाढवणारी पपई झाली महाग! पपईचे गुणधर्म ‘या’ ४ फळांमध्येही

Subscribe

कोरोनाच्या काळात अनेक फळं आणि भाज्या महाग झाल्या आहेत. या दिवसात पपईची मागणी खूप वाढली असल्यामुळे त्याचे दर देखील वाढले आहेत. आपल्या आरोग्यासाठी पपई खूप फायदेशीर आहे. पोट व्यवस्थित राहण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोकं पपईचे सेवन करतात. टायफाईडसारख्या आजारांदरम्यान डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात. पण सध्या कोरोनाच्या काळात पपई खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पपईची किंमत वाढली असून मध्यमवर्गासाठी पपई खाणे कठीण झाले आहे. परंतु आता तुम्हाला याची चिंता करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला पपई सारखे गुणधर्म असणारे ४ फळांबाबत सांगणार आहे. जे तुम्ही पपईऐवजी नक्की खाऊ शकता.

पपईचे फायदे

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी९ असते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तसेच पपईत फायबर आणि फोलिक अॅसिडचे प्रमाण देखील जास्त असते, ज्यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होता. पपईत दोन विशेष एंजाइम असतात जे पपॅन आणि चाइमोपन सारख्या गोष्टी असतात, यामुळे पचनसंबंधित समस्या दूर होतात. याशिवाय शरीराची सूज आणि कॅन्सर सारख्या आजारांसाठी पपई खूप फायदेशीर आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि पोटॅशिअम असते, यामुळेच पपई इतका शरीरासाठी चांगला आहे. परंतु जर तुम्हाला पपई मिळत नसेल तर तुम्ही पपईच्या जागी इतर फळं खाऊ शकता. ती कोणती ते पाहा

- Advertisement -

पपईसारखे फायदेशीर असलेली फळं

खरबूज – पपईप्रमाणे खरबूजमध्ये व्हिटॅमिन सी प्रमाण खूप असते. त्याप्रमाणे खरबूजमध्ये फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. व्हिटॅमिन ए खरबूज आणि पपई दोन्हींमध्ये आहेत. हे डोळे, प्रतिकारशक्ती आणि निरोगी त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

अननस – पपईत असलेले व्हिटॅमिन अननसात देखील असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि व्हिटॅमिन केचे प्रमाण असते. तसेच पपईत असणारे फोलेट अननसामध्येही असते. अननस रोगप्रतिकारशक्ती वाढण्याविण्यास आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. अननसामुळे पचनक्रिया सुधारते.

- Advertisement -

आंबा – उन्हाळ्यात आंबा सर्वात जास्त असतो. आंब्यात पपईचे अनेक गुणधर्म आहेत. जर तुम्हाला पपई मिळत नसेल तर तुम्ही आंबा खाऊ शकतो. पपई आणि आंब्यामध्ये ८ टक्के डायटरी फायबर असते. आंब्यात व्हिटॅमिन ए आणि फोलेट पपईपेक्षा अधिक असते. व्हिटॅमिन सी देखील आंब्यात असते. आंबा पचनासाठी, डोळ्यासाठी आणि हृदयासाठी चांगला असतो.

सप्ताळू (पीच) – सप्ताळू याला आडू, पीच असे म्हटले जाते. आडूमध्ये पपईसारखे गुणधर्म आढळले आहेत. यात अँटी-इंफ्लामेटरी गुण भरपूर असतात. कॅन्सर, हृदयविकाराचा झटका यासाठी आडू खूप फायदेशी आहे. पपई आणि पीचमध्ये समान व्हिटॅमिन के आढळले आहेत. यामुळे पेशीची संख्या वाढण्यास मदत होते. तसेच पपई आणि पचीमध्ये पोटॅशिअम समान प्रमाणात असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -