Thursday, May 16, 2024
घरमानिनीफॅमिली ट्रिपला जाताना या चुका टाळा

फॅमिली ट्रिपला जाताना या चुका टाळा

Subscribe

आजकाल प्रत्येक व्यक्ती इतकी बिझी असते की ते स्वतःसाठी वेळ काढू शकतो, त्यामुळे कुटुंबाला वेळ देणं हे तर लांबच राहील. त्यामुळे कुटुंबाशी असलेले नाते सुधारण्यासाठी आणि त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालविण्यासाठी फॅमिली बॉण्डिंग सुधारण्यासाठी आणि त्याच्यासोबत क्वालिटी टाइम घालविण्यासाठी फॅमिली ट्रिपचे आयोजन करणे ही नक्कीच चांगली कल्पना आहे. पण अनेकदा फॅमिली ट्रिप प्लॅन करताना छोट्या छोट्या चुका केल्या जातात, ज्याने सहलीची संपूर्ण मजा निघून जाते. जाणून घेऊयात, अशा चुका ज्या फॅमिली ट्रिप प्लॅन करताना टाळायला हव्यात,

पूर्वनियोजनाकडे दुर्लक्ष – जेव्हा कौटुंबिक सहलीला जाण्याची वेळी येते तेव्हा याचा अर्थ असा नाही फक्त उठून कुठेही जा. त्यासाठी नेहमी प्री- प्लॅन अत्यंत महत्वाचे आहे. जर आपण पूर्व नियोजनाकडे दुर्लक्ष केले तर ते आपल्यासाठी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसाठी समस्या निर्माण करू शकते. उदाहरणार्थ, फॅमिली ट्रिप चा खर्च किती? प्रवासाला कितीवेळा लागणार आहे? राहण्याची सोय झाली आहे का नाही? या सर्व गोष्टींकडे आधीच लक्ष दिल्यास तुमचा फॅमिली ट्रिपचा प्लॅन फसणार नाही.

- Advertisement -

बुकिंग – एकदा तुम्ही फॅमिली ट्रिप साठी डेस्टिनेशनपासून बजेटपर्यंत निर्णय घेतला की, मग तुम्ही आगाऊ बुकिंग करायला हवे. आगाऊ बुकिंग केल्यास तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. याशिवाय जाताना आणि नंतर त्रास होत नाही. याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे बुकिंग कराल तिथे रिटर्न पॉलिसीबद्दल जाणून घेण्याचाही प्रयन्त करा.

ओव्हरपॅकींग – ही एक कॉमन चूक आहे जी बरेच जणांकडून फॅमिली ट्रिपला जाताना घडते. प्रवासात सगळ्यात गोष्टींची गरज भासेल आपल्याला काहीच मिळणार नाही असा विचार करून बरेचजण जास्त सामान पॅक करतात. पण, ओव्हरपॅकिंगमुळे तुमचा प्रवास किचकट होऊ शकतो. त्यामुळे फॅमिली ट्रिपला जाताना नेहमी जीवनावश्यक वस्तूच पॅक करा आणि पॅकिंग करताना कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजांची काळजी घ्या.

- Advertisement -

स्वत्रंत सीट बुक न करणे – अनेकदा असे दिसून येते की, लोक पैसे वाचविण्यासाठी मुलांसाठी स्वत्रंत तिकिटे बुक करत नाही. मुलं कुठेही जुळवून घेतील असे त्यांना वाटते. मात्र असे केल्याने मुलाची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे फॅमिली ट्रिप ला जाताना मुलांसाठी आणि तुमच्यासाठी स्वत्रंत अशी बसण्याची व्यवस्था बुक करा अशाने तुम्ही तुमच्या फॅमिली ट्रिपचा आनंद घेऊ शकाल.

 

 

 


हेही वाचा : एप्रिलमध्ये कुटुंबासमवेत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे

 

- Advertisment -

Manini