परीक्षा संपून मुलांना उन्हाळी सुट्टी सुरु झाली आहे. अनेक घरात उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचे याचे प्लॅनिंग सुरु झाले असेल. तुमच्या घरीही ट्रिपचे प्लॅनिंग सुरु झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला मुंबई जवळील अशी काही ठिकाणे सांगणार आहोत, जी तुम्ही मुलांसह एक्सप्लोर करू शकता. मुंबईजवळ अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला फॅमिलीसह भरपूर एन्जॉय करता येईल.
अलिबाग –
विकेंड घालविण्यासाठी अलिबाग अनेक जणांचा पहिला पर्याय असतो. तुम्ही अलिबागला रोड मार्गे आणि क्रूझनेही जाऊ शकता. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी अलिबाग ओळखले जाते. मुंबईहून केवळ ३ ते ४ तासात तुम्ही अलिबागला पोहोचू शकता. त्यामुळे उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करण्यासाठी अलिबागची निवड तुम्हाला करता येईल.
महाबळेश्वर –
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक सुंदर आणि रमणीय ठिकाण आहे. ब्रिटिश राजवटीत महाबळेश्वर ही मुंबईची उन्हाळी राजधानी होती. महाबळेश्वरमध्ये अनेक सुंदर अशी मंदिरे देखील आहेत. उन्हाळ्याची सुट्टी घालविण्यासाठी महाबळेश्वर एक उत्तम पर्याय आहे. मुंबईहून केवळ 5 ते 7 तासात तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकता.
नाशिक –
नाशिकमध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत. येथे अनेक सुंदर मंदिर असून कुटुंबासमवेत धार्मिक स्थळे पाहण्याचा बेत आखात असाल तर नाशिक उत्तम पर्याय ठरेल. मुंबईहून विकेंड ट्रीपसाठी नाशिक जवळ आहे. मुंबईहून नाशिकला पोहचण्यात केवळ 4 तासांचा प्रवास करावा लागतो.
दापोली –
तलाव, धरणे, धबधबे या सर्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर दापोलीला फॅमिलीसह अवश्य भेट द्यायला हवी.
माथेरान –
मुंबईच्या काही भागातून माथेरानला फार कमी वेळात पोहोचता येते. माथेरान समुद्रसपाटीपासून २६२५ फूट उंचीवर असून संपूर्णपणे हिरवेगार आहे. फॅमिली ट्रीपसाठी हा ऊत्तम पर्याय असू शकतो. येथील अनेक पॉईंट तुम्हाला पाहता येथील तसेच घोडेस्वारीचा आनंदही घेता येईल.
खंडाळा –
ट्रेकिंगसारखी ॲक्टिव्हिटी आवडणाऱ्या व्यक्तींसाठी खंडाळा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही हायकिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लायम्बिंग यासारख्या ॲक्टिव्हिटी करू शकता. फॅमिलीसह उन्हाळी सुट्टी तुम्हाला येथे एन्जॉय करता येईल.
हेही पहा : हॉटेल check Out ची वेळ दुपारी 12च का?
Edited By – Chaitali Shinde