Sunday, April 28, 2024
घरमानिनीTravel Packing Tips : बॅग पॅक करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा

Travel Packing Tips : बॅग पॅक करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा

Subscribe

प्रवास करायचा म्हटलं की सर्वात मोठी अडचण वाटते ती म्हणजे बॅग भरण्याची. पॅकिंग करायचं म्हटलं की अनेक जणांना टेन्शन येते. कुठेही फिरायला जायचं असलं की कमीत कमी पण महत्त्वाच्या सामानाची बांधाबांध कशी करायची हा मोठा प्रश्न असतो.  ट्रिपच्या सामानाची बांधाबंध करण्यात खूप वेळ निघून जातो. त्यातच जर पॅकिंग करायला पुरेसा वेळ मिळाला नाही तर गडबडीत काही गोष्टी घेण्याच्या राहून जातात. मग फिरायला गेलेल्या नव्या ठिकाणी त्या गोष्टी शोधाव्या लागतात. यासाठी जर तुम्ही आधीच पॅकिंग करताना काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ही अडचण येणार नाही.

बॅग

ट्रिपला जाताना मोजकंच पण गरजेचं सामान स्वतःबरोबर ठेवा. ट्रिपमध्ये हाताळण्यासाठी सोप्या अशा स्टाइलच्या बॅग निवडा. ट्रेकला जाणार असाल तर तुमची सामानाची बॅग हलकी असू द्या.

- Advertisement -

त्वचेची काळजी

प्रवासासाठी तुम्हाला लागणारी औषधं, शाम्पू, साबण, तेल अशा सगळ्या गोष्टी आहे तशा न घेता छोट्या बाटल्यांमध्ये काढून घ्या. ज्यामुळे बॅगेत गर्दी होणार नाही. अशावेळी महिलांनी गरजेच्या वस्तू घेऊन जाण्यास सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे. तसेच ज्या तुम्ही वस्तू किंवा इतर कोणतेही प्रोडक्ट खरेदी करणार आहे, ते स्मॉल पॅकवाले खरेदी करावे. यामुळे बॅग हेवी होत नाही.

कपड्यांची निवड

प्रवासादरम्यान ओव्हरपॅकिंग तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत, ओव्हरपॅकिंग टाळण्यासाठी, प्रवासाचा कार्यक्रम तयार करा आणि त्यानुसार कपडे पॅक करा. तुम्ही भेट देणार असलेल्या ठिकाणांबद्दल जाणून घ्या आणि हवामानानुसार तुमचे कपडे निवडा.

- Advertisement -

शूजचा एकच जोडा घ्या

सहलीला जाताना प्रत्येक परिस्थिती आणि कपड्यांनुसार योग्य असे पादत्राणे सोबत ठेवा. प्रत्येक ड्रेसवर मॅच होणारे शूज सोबत ठेवा. प्रत्येक कपड्यांसाठी वेगवेगळे शूज घेणं टाळा कारण ते बॅगमध्ये खूप जागा घेते.

जाड कपडे पॅक करणे टाळा

थंड ठिकाणी प्रवास करत असल्यास, कमी कोट किंवा जॅकेट घालण्याचा प्रयत्न करा, कारण ते खूप जागा घेतात. अशा परिस्थितीत, आपण जिथे जाणार आहात तिथे खरेदी देखील करू शकता, कारण सामान्यतः थंड हवामानात चांगले पर्याय उपलब्ध असतात.

प्लॅनिंगची यादी

महत्त्वाचे म्हणजे खरेदी करण्यापू्र्वी तुम्हाला कोणत्या गोष्टी आवश्यक आहे. अगदी कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत याची यादी तयार करा. जेणेकरुन बॅग पॅक करताना यादीनुसार वस्तू पॅकिंग केलात तर ट्रिप गेल्यानंतर अमुक राहिल तमुक राहिल,असं बोलण्याची वेळ येणार नाही.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू

तुम्हाला आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची यादी तयार करा. त्यानुसार सर्व साहित्य बॅगेत ठेवा. मोबाईल चार्जर, पॉवर बँक, इयरफोन, ऑक्स केबल, टॉर्च आणि ब्लूटूथ स्पीकरसह तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पॅक करा. तुमच्या वाहनावरील चार्जिंग पोर्ट तपासा. कारण त्यावर तुम्ही तुमचे डिव्हाइस चार्ज करू शकता.

- Advertisment -

Manini