Banana Benefits : कोणत्याही हंगामात एक ‘केळे’ खाण्याचे आहेत अनेक फायदे

Banana Benefits : कोणत्याही हंगामात एक ‘केळे’ खाण्याचे आहेत अनेक फायदे

केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

चांगल्या आरोग्यासाठी(good health) व्यायाम करणं जसं फायदेशीर असतं त्याचप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीचा आहार(good food) सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतो. योग्य आणि सकस आहारात फळांचा सुद्धा समावेश असणं गरजेचं असतं. अशी अनेक फळं आहेत ज्यांचा सेवनाने शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. त्याच प्रमाणे ‘केळं’ हे असं फळ आहे, की ज्याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. त्याचसोबत केळ्याचे सेवन केल्याने शरीरामधील रक्ताभिसरणंही सुरळीत राहते. केळ्याचे सेवन केल्याने अनेक आश्र्चर्यकारक फायदे होतात. या फळाचे आणखी काय फायदे आहेत ते जाणून घेण्यासाठी ही बातमी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल.

आणखी वाचा – दह्यासोबत ‘हे’ ५ पदार्थ खाणे टाळा, फायद्याऐवजी होईल तोटा

आणखी वाचा – Recipe : उपवासात साबुदाण्याचे चटपटीत थालीपीठ नक्की ट्राय करा

१. वजन नियंत्रित राहतं –

केळ्याचे(banana) सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यासाठी खूप मदत होते. ज्या व्यक्तींना स्वतःच्या स्थूलपणावर नियंत्रण ठेवायचे आहे. अश्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात केळ्याचे सेवन केल्याने त्यांना त्याचा नक्की फायदा होईल. त्याचबरोबर हे फळ नियमित खावं तरच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसतील.

 

२. शरीरातील साखर नियंत्रित राहते –

केळ्याचे(banana benefits) सेवन केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. याचसोबत या फळाचे सेवन केल्याने हृदय सुद्धा निरोगी राहतं. केळं किंवा कोणत्याही फळांमध्ये नैसर्गिक साखर (गोडवा) असते. त्यामुळे त्यातील पोषक घटक हे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

आणखी वाचा – Be careful : ‘फ्रुट शेक’ पिणे किती फायदेशीर? वाचा काय सांगतं ‘आयुर्वेद’

आणखी वाचा –  Vegan Diet म्हणजे काय ? बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा करतात फॉलो

 

३. पचनसंस्था सुधारते-

काही मंडळींच्या सारख्या पोटाच्या तक्रारी असतात. सारखे पोटाचे त्रास होतात. अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारात नियमितपणे केळ्यांचा समावेश(banana) करावा त्याने पोटाच्या समस्या दूर होतात. पचनक्रिया सुद्धा सुधारते. त्याचबरोबर पोट फुगण्याची समस्या सुद्धा दूर होते.

आणखी वाचा –  पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचविण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

 

४. कॅल्शियम भरपूर मिळते –

काहींच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते. अश्या व्यक्तींनी नियमित त्यांच्या आहारात केळ्याचा समावेश करावा. तुम्ही रोज एक केळं जरी खाल्लं तरीही तुमचं शरीरात कॅल्शियम वाढेल.

 

आणखी वाचा – पावसात भिजण्यापूर्वी केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्सचा नक्कीच उपयोग होईल

५ . नैराश्य कमी होते –

केळ्याचे सेवन केल्याने नैराश्य सुद्धा कमी होते. हे संशोधनातूही सिद्ध झाले आहे. केळ्यामध्ये काही प्रथिनं असतात ज्यामुळे नैराश्य कमी होते. त्याच बरोबर केळ्यामध्ये आढळणारं व्हिटॅमिन बी ६ रक्तमधील ग्लुकोजचं प्रमाण योग्य ठेवण्यात मदत करतं.

 

इथे दिलेली माहिती घरगुती वैद्यकीय पद्धतीवर आधारित आहे. जर का तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करायचे असल्यास तुम्ही तज्ज्ञांचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

 

 

 

 

First Published on: July 4, 2022 11:07 AM
Exit mobile version