Monday, April 29, 2024
घरमानिनीFashionबॉडीशेपनुसार करा साडीची निवड

बॉडीशेपनुसार करा साडीची निवड

Subscribe

साडी हा महिलांचा आवडता पेहराव. यामुळे बऱ्याचवेळा महिला मागचा पुढचा विचार न करता आवडेल ती साडी विकत घेतात. पण नंतर ती साडी अंगावर खुलून दिसत नसल्याचं किंवा नीट ड्रेप होत नसल्याचे लक्षात येतं. त्यावेळी मात्र महिलांचा हिरेमोड होतो. खरं तर साडी विकत घेताना तिच्या रंगाबरोबरच तिचे कापड म्हणजे फॅब्रिकही बघून घ्यावे. कारण साडी आणि तिचे मटेरियल बॉडीशेपनुसार जर निवडले तर साडी अंगावर खुलून दिसतेच शिवाय चारचौघात तुमची पर्सेनेलिटीही आकर्षक दिसते. त्यासाठी कोणत्या बॉडीशेपवर कोणत्या फॅब्रिकची साडी शोभून दिसते ते बघूया.

How To Wear A Golden Saree Like A Bollywood Celebrity|Zee Zest

- Advertisement -
  • उंच आणि सडपातळ

जर तुम्ही उंच आणि अंगाने सडपातळ असाल तर तुम्ही जॉर्जेट, रॉ सिल्क, टसर आणि शिफॉनसह विविध प्रकारच्या फॅब्रिक्सची साडी नेसू शकता. असा बॉडीशेप असलेल्या महिलांनी मोठ्या आणि ठळक प्रिंट असलेल्या साड्या नेसाव्यात.

तसेच सडपातळ असल्याने तुम्ही लेसवर्क, ब्रॉड बॉर्डर असलेल्या साड्या देखील वापरू शकता. नेटचे शीट फॅब्रिक देखील उंच व सडपातळ बॉडीशेपवर शोभून दिसते. तसेच या बॉडीशेपच्या व्यक्ती कॉटनच्या साड्याही वापरू शकता.

- Advertisement -
  • पियर बॉडीशेप

जर तुमच्या शरीराचा आकार पियर या फळाच्या आकाराप्रमाणे असेल तर जॉर्जेट फॅब्रिकची साडी तुमच्यावर सर्वात खुलून दिसेल. या साडीमुळे तुमचा हॅवी बॉडीशेपही बँलन्स होईल.

तसेच पियर बॉडीशेप असलेल्या महिला सिल्क, बनारसी सिल्क साड्याही ट्राय करू शकता. हेवी एम्ब्रॉयडरी साडीही या बॉडीशेपवर उठून दिसते.

तसेच जर तुमची उंची कमी असेल आणि बांधा सडपातळ असेल तर जॉर्जेटपासून शिफॉनपर्यंत कोणत्याही फॅब्रिकची निवड करू शकतात. तसेच जर तुम्ही सिल्क साडी नेसणार असाल तर प्युअर सिल्कची साडी कमी उंचीच्या सडपातळ महिलांवर छान दिसते.

Vidya Balan Is An Epitome Of Grace And Elegance In A Red Cotton Saree By  Suta Worth Rs 2K

 

  • अॅपल शेप

तसेच जर तुमचा बॉडीशेप अॅपल शेप म्हणजेच सफरचंदासारखा हॅवी बॉडी असलेला तर जॉर्जेट किंवा शिफॉन साडी तुमच्यावर शोभून दिसेल. या साड्या तुमच्या बॉडीशेपला हायलाईट करत असल्याने तुमचा हॅवी लूकही या फॅब्रिकमध्ये दिसून येणार नाही. त्यासाठी विद्या बालन किंवा सोनाक्षी सिन्हा यांना तुम्ही फॉलो करू शकता. तसेच डार्क कलरचे फुल स्लीव्हज किंवा क्वार्टर स्लीव्ह ब्लाउज अशा बॉडीशेपवर उठून दिसतात.

  • कर्व बॉडी

या प्रकारचा बॉडीशेप असणाऱ्या महिलांवर ऑर्गेन्झा, कॉटन किंवा सिल्क साड्या नेसू शकतात. हेवी एम्ब्रॉयडरी आणि हलके रंग त्यांना जास्त शोभतात. प्रियंका चोप्रा हीचा बॉडीशेप या कॅटगरीत असल्याने तिच्यावर कोणत्याही फॅब्रिकची साडी खुलून दिसते.

 


हेही वाचा :

प्रत्येक महिलेकडे ‘या’ 8 प्रकारच्या साड्या असायलाच हव्यात

- Advertisment -

Manini