सावधान ! कॉफी जास्त प्यायल्याने वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका

सावधान ! कॉफी जास्त प्यायल्याने वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका

सकाळी झोपेतून उठल्यावर आळस घालवण्यासाठी अनेक जण कॉफी पिणे पसंत करतात, अलीकडे चहा पिणाऱ्यांच्या तुलनेत कॉफी पिणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे. खरं तर चहापेक्षा कॉफी शरीरासाठी फायदेशीर असते. जगभरात तयार होणारी कॉफी ६० टक्के अरेबिका आहे आणि ४० टक्के रोबस्टा आहे. कॉफी जगातील सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणार्‍या पेय पदार्थांपैकी एक आहे. कॉफी बीन्स हे एक प्रमुख पीक आणि एक महत्त्वाचे निर्यात करता येणारं उत्पादन आहे. काही रिसर्चनुसार सांगण्यात येतं की, कॉफी प्यायल्याने टाइप २ डायबिटीज, कॅन्सर यांसारख्या आजारांमध्ये चांगला फायदा होतो. मात्र, कॉफी थोड्याच प्रमाणात पिणं योग्य मानलं जातं, नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

शरीरासाठी आरोग्यदायी कॉफी

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, उकळलेल्या कॉफीमध्ये कॅफेस्टोल आणि कहवेओल यांसारखे नैसर्गिक तेल उपलब्ध असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.

१ ते ३ कप कॉफी पिण्याचे फायदे

एक कप कॉफीमध्ये जवळपास १०० mg कॅफिन असते, जे शरीराच्या आतड्यांसंबंधित हालचाल सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे धकवा दूर होतो. २ कप कॉफी प्यायल्याने व्यायामात सुधारणा होते आणि हृदयविकाराच्या आजारापासून सुटका होते. इतकंच नव्हे तर ३ कप कॉफी प्यायल्याने हृदयरोगाचा धोका १२ टक्क्यांनी कमी होतो.

४ ते ६ कप कॉफी प्यायल्याने काय होतं?

दररोज ४ कप कॉफी प्यायल्याने नॉन-अल्कोहोल रोगाचा धोका १९ टक्क्यांनी कमी होतो, त्याबरोबरच दररोज ५ कप कॉफी प्यायल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका सुमारे २९ टक्क्यांनी कमी होतो.

मात्र कधीही जास्त कॉफी पिऊ नका

कधीही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं आपल्यासाठी नुकसानदायक ठरतं, कॉफीच्या जास्त सेवनाने अस्वस्ठता, पोट खराब होणे, झोप न लागणे, उलट्या होणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या निर्माण सहन कराव्या लागू शकतात.


हेही वाचा :उन्हाळ्यामध्ये ताक पिण्याचे ५ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या…

First Published on: April 1, 2022 1:25 PM
Exit mobile version