घरलाईफस्टाईलउन्हाळ्यामध्ये ताक पिण्याचे ५ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या...

उन्हाळ्यामध्ये ताक पिण्याचे ५ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या…

Subscribe

ताकाचे अनेक गुणधर्म आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत. ताकामध्ये गोड, आम्लयुक्त, अग्निवर्धक, शुद्ध करणारे गुणधर्म आहेत. दह्यात पाणी घालून रवीने घुसळल्यास ताक तयार होते. खरंतर ताक दह्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. जेवल्यानंतर ताक प्याल्याने खूप फायदा होतो.

उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा फिटनेस आणि डायटकडे लक्ष न दिल्याने गरमीमध्ये शरीराला कमजोरीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज एक असं पेय सांगणार आहोत, ज्याचा वापर अनेक कुटुबांमध्ये केला जातो, ते पेय म्हणजे ताक. उन्हाळ्यामध्ये ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. ताकामुळे शरीराला गारवा मिळतो, ज्यामुळे उन्हाळ्यात गरमीचा त्रास होत नाही.

- Advertisement -

खरं तर ताकाचे अनेक गुणधर्म आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत. ताकामध्ये गोड, आम्लयुक्त, अग्निवर्धक, शुद्ध करणारे गुणधर्म आहेत. दह्यात पाणी घालून रवीने घुसळल्यास ताक तयार होते. खरं तर ताक दह्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. जेवल्यानंतर ताक प्याल्याने खूप फायदा होतो.

१. ताकामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजतत्वे असतात.

ताकामध्ये ए, बी, सी, ई आणि के जीवनसत्त्वे असतात, याच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता पूर्ण होते. ज्या लोकांमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता कमकुवत आहे, अशा लोकांनी ताक सेवन करणे आवश्यक आहे. तसेच ताकामध्ये खनिजे सुद्धा मुबलक प्रमाणात आढळतात, कारण ताकामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह मुबलक प्रमाणात असते. अशा स्थितीत उन्हाळ्यात शरीरातील सर्व खनिजे मिळून शरीर मजबूत होते. खरंतर ताक प्यायल्यानंतर अन्न सहज पचते. यामुळेच उन्हाळ्यात ताकाला प्रत्येक स्वयंपाकघरात विशेष महत्व प्राप्त होते.

- Advertisement -

२. अॅसिडिटी दूर करण्यासाठी ताक गुणकारी आहे.

अॅसिडिटीची समस्या आजच्या काळात अनेकांना सहन करावी लागते. खरंतर उन्हाळ्यात थोडेसे ताक प्यायल्यानंतरच अॅसिडिटी होऊ लागते. पण ताक अॅसिडिटीवर रामबाण उपाय म्हणून काम करते. ताकामध्ये काळी मिरी आणि जिरे मिसळून प्यायल्याने अॅसिडिटी लगेच नाहीशी होते. त्यामुळे डॉक्टरांकडून दुपारी ताक पिण्याचा सल्ला दिला जातो.

३. ताकामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

अनेकदा उन्हाळ्यामध्ये शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे अनेकदा आपल्याला डिहायड्रेशनचा सामना करावा लागू शकतो. पण ताक हा असा पदार्थ आहे त्याच्या सेवनाने उन्हाळ्यामध्ये शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. जर तुम्ही दिवसातून एक किंवा दोन ग्लास ताक प्यायले तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवनार नाही.

४. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त

ताक हे आयुर्वेदिक पेय मानले जाते, ज्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ताक उपयुक्त मानले जाते. जर तुम्ही जेवणानंतर ताक सेवन करत असाल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

५. ताक त्वचेसाठी उपयुक्त आहे

ताक केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर मानले जाते. प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए हे गुणधर्म ताकामध्ये आढळतात ज्यामुळे त्वचा निरोगी व चमकदार बनते.


हेही वाचा : अशा पद्धतीने बनवा साबुदाणा-सफरचंदाची पौष्टिक खीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -