Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthआहारात कडधान्यांचा समावेश करण्याचे 'हे' आहेत फायदे

आहारात कडधान्यांचा समावेश करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

बऱ्याचदा आहारात कडधान्यांचा वापर केला जातो परंतु अनेकजण कडधान्याचे सेवन करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे कडधान्यामध्ये असलेली जीवनसत्व आणि पोषकतत्वे मिळत नाही आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. मात्र, ही कडधान्य का खावी? त्याच्यात असे कोणते गुणधर्म आहेत? ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कडधान्यांचा समावेश करण्याचे फायदे

  • मूग

Benefits Of Moong Dal | Mung Bean | Rajbhog Foods Blog

- Advertisement -

शिजवलेले किंवा भिजवलेल्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्वे असून मुगामध्ये कॅल्शियम, लोहयुक्त खनिज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट व व्हिटॅमिन्स असतात. ताप आणि खोकला झालेल्या व्यक्तीसाठी ते लाभदायी असतात.

  • तूरडाळ

Nutritional & Health Benefits of Toor Dal | 24 Mantra

- Advertisement -

तूरडाळीत खनिज, कार्बोहायड्रेट, लोहयुक्त खनिज, कॅल्शियम यांचे योग्य प्रमाण असते. तसेच तूर डाळ ही पचण्यास उत्तम असते. त्यामुळे लहान बालकांना तूरडाळीचे पाणी पिण्यास देतात. तसेच आजारी व्यक्तीस तुरीच्या डाळीची खिचडी खाण्यास देतात. मात्र, दमा आणि वाताचे आजार असणाऱ्या व्यक्तींना तूरडाळीपासून त्रास होतो.

  • मसूर

Masoor Dal Face Packs: मसूर दाल से हफ्ते भर में पा सकते हैं निखरी रंगत, ऐसे करें इसका इस्तेमाल - Masoor Dal Face Packs Get glowing and healthy complexion within a week

मसूरच्या डाळीचा उपयोग रक्तशुद्धी तसेच रक्तवाढीसाठी होतो. जुलाब, खोकला आणि अपचन यावर मसूरची डाळ लाभदायी असते. तसेच मसूरच्या डाळीचे पीठ चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो.

  • हरभरे

चने खाने के फायदे (bhune chane khane ke fayde) - Healthy Master

हरभरे आणि हरभऱ्याची डाळ आरोग्यासह सौंदर्यासाठी देखील उत्तम आहे. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. रक्तदाब, खोकला आणि कावीळ या आजारावर लाभदायी असून हरभऱ्याच्या डाळीचे पीठ केस आणि त्वचेच्या सौंदर्यावर गुणकारी असते. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.

  • उडीद

black gram | pfeiffer family: the indian cookbook

उडदाची डाळ शरीरास थंड असते. उडदाच्या डाळीत कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम व प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळतात. मुळव्याध, दमा, पक्षाघात आदी आजार असलेल्यांनी त्यांच्या आहारात उडीद डाळीचा जास्त वापर केला पाहिजे. या आरोग्यास फायदा होतो.

 


हेही वाचा :

कांद्याच्या पातीचे आहेत अनेक फायदे

- Advertisment -

Manini