सूर्यनमस्काराचे फायदे आणि किचन टिप्स

सूर्यनमस्काराचे फायदे आणि किचन टिप्स

सूर्यनमस्कार

आजकाल फिटनेसप्रति सजगता वाढतेय. बॉलिवूडच्या बलदंड नायक आणि सुकुमार नायिकांचा आदर्श समोर ठेवत बरेच जण व्यायामाकडे वळताहेत. शरीर फिट अ‍ॅण्ड फाईन ठेवण्यासाठी वर्कआऊट, डाएटिंग आदींची जोरदार तयारी करतात. मात्र साध्या सूर्यनमस्कारातूनही शरीराला परिपूर्ण व्यायाम मिळण्याची तजवीज आहे.

नियमितपणे सूर्यनमस्कार घातल्यास फिटनेस राखणे सहज सुलभ होऊ शकते. या एका व्यायाम प्रकारात विभिन्न प्रकारच्या व्यायामांचे लाभ समाविष्ट आहेत. कुठल्याही वयाची व्यक्ती या व्यायाम प्रकाराने फिटनेस मिळवू शकते. यामध्ये बारा आसने आहेत. बारा आसने करताना बारा श्लोकांचे उच्चारण होते. योग्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार घातल्यास अत्यंत कमी अवधीत चांगले परिणाम दिसून येतात. सुरुवातीला एका वेळी तीन नमस्कार घालून नंतर संख्या वाढवली जाते.

 

किचन टिप्स – 

*करपलेल्या भांड्याचा तेलकटपणा घालवण्यासाठी भांड्यात पाणी भरुन कांद्याचे तुकडे टाकून उकळून घ्यावे व थंड झाल्यावर भांडे धुवावे.

* पनीर मुलायम भाजी बनवताना न तुटणारे होण्यासाठी थोडावेळ गरम पाण्यात टाकून

काढावेत. मग भाजीसाठी वापरावे.

*बदाम जर १५-२० मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवले तर त्याचे साल लवकर निघतात.

*नासलेल्या पोळ्यांना कुकरमध्ये १-२ शिट्ट्या देवून उकडून घ्याव्यात व तेलाने तव्यावर कडक भाजून घ्याव्या अशा पोळ्या रूचकर व नरम लागतात यास खाण्यासाठी आरामात वापरू शकता.

*टमाटरचा पल्प काढण्यासाठी, टमाटर कुकरमध्ये मीठ टाकलेल्या पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन् काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेवी व ज्युस साठी करता येतो.

First Published on: December 13, 2018 4:07 AM
Exit mobile version