Saturday, April 27, 2024
घरमानिनीएप्रिलमध्ये कुटुंबासमवेत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे

एप्रिलमध्ये कुटुंबासमवेत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे

Subscribe

एप्रिल हा वर्षातील असा महिना आहे जेव्हा देशाच्या जवळजवळ प्रत्येक भागात उष्णता वाढू लागते. यासह या महिन्यात मुलांच्या शाळेच्या परीक्षा संपून सुट्ट्याही सुरु होतात. मुलांच्या सुटया म्हणजे प्रवासाची वेळ. सुट्टीच्या दिवसात मुले पालकांसोबत फिरण्याचा आग्रह करू लागतात. त्यामुळे तुम्हीही कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.

नैनिताल – एप्रिलच्या सुट्ट्या तुम्ही नैनितालमध्येही घालवू शकता. नैनीताल हे एक हिल स्टेशन आहे. समुद्रसपाटीपासून २ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या नैनितालमध्ये एप्रिलमध्ये थंड वाऱ्याचा आनंद लुटता येतो. येथे तुम्ही मुलांसोबत बोटिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय केव्ह गार्डन, टिफिन टॉप अशी ठिकाणे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. कुटूंबासमवेत येथे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही करू शकता.

- Advertisement -

डलहौसी – समुद्रसपाटीपासून 6 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर वसलेले डलहौसी हे देशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. डलहौसीला देशाचे मिनी स्विझर्लंड असे म्हटले जाते. एप्रिल महिन्यात जेव्हा इतर भागात कडक उष्णता असते, तेव्हा डलहौसीचे तापमान 10 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. येथे तुम्ही खज्जियार, पंचपला धबधबा आणि गंजी हिल अशी उत्तम ठिकाणे एक्प्लोर करू शकता.

- Advertisement -

दार्जिलिंग – दार्जिलिंग हे हिमालयाच्या सुंदर दऱ्यांमध्ये असलेले एक सुंदर गिल स्टेशन आहे. उंच डोंगर, घनदाट जंगले आणि तलाव – धबधबे या हिल स्टेशनच्या सौंदर्यात भर घालण्याचे कमी करतात. येथे तुम्ही टॉय ट्रेनचा आनंद मुलांना देऊ शकता. यासह टायगर हिल, बटासिया लूप, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, हँप्पी वेळ आणि रॉक गार्डन अशी उत्तम ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील.

शिमला – वर्षांतील कुठलाही महिना असो, शिमल्याला भेट देण्याची एक वेगळीच मज्जा असते. समुद्रसपाटीपासून 2 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर वसलेल्या शिमल्यात कडक उन्हातही तापमान १५ ते २५ अंश सेल्सिअसपर्यत असते. येथे तुम्हाला कुटुंबासोबत कुफ्री मॉल रॉड, जाखु हिल, जाखु मंदिर आणि समर हिल सारखे बेस्ट ठिकाणे पाहू शकता.

 

 

 


हेही वाचा : Periods Tips : Periods मध्ये प्रवास करताय? मग लक्षात ठेवा या गोष्टी

 

- Advertisment -

Manini