घरलाईफस्टाईलज्येष्ठांच्या पाया पडण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे

ज्येष्ठांच्या पाया पडण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे

Subscribe

ज्येष्ठांच्या पायाला स्पर्श करणे, पाया पडणे त्यांचे आशिर्वाद घेणे ही प्राचीन भारतीय परंपरा आहे. जी आदराचे लक्षण मानली जाते. प्रामुख्याने सर्व हिंदू कुटुंबांमध्ये हे दिसून येते. यामागचे मुख्य कारण आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या ज्येष्ठांना वाकून पदस्पर्श करते तेव्हा त्याचा अहंकार झुकतो . कारण हा हावभाव ज्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श केला जातो त्या व्यक्तीचे वय, अनुभव, आणि ज्ञान यांप्रती आदर दर्शवतो. त्यानंतर ज्ये्ष्ठ व्यक्ती आशीर्वाद देतात. अशी आपल्याकडे प्रथा आहे.

चरण स्पर्श करण्यामागील शास्त्र
आपल्याकडे मोठे भाऊ, आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक, अध्यात्मिक गुरू आणि इतर ज्येष्ठ नागरिकांच्या पायांना स्पर्श करतात. फक्त वडीलधाऱ्यांच्या आणि अशा आदरणीय लोकांच्या चरणांना स्पर्श केला जातो कारण त्यांनी आयुष्यभर भरपूर ज्ञान, अनुभव आणि गुण आत्मसात केलेले असतात. जे इतरांसाठी आदर्श असतात. यामुळे अशा व्यक्तींच्या पाया पडणे त्यांचे आशीर्वाद घेणे भाग्यशाली मानले जाते.

- Advertisement -

हिंदू परंपरेत पायांना स्पर्श करण्याचे महत्त्व

वेदकाळात भारतात ज्येष्ठांच्या पायाला स्पर्श करण्याची प्रथा स्विकारण्यात आली आणि त्याला चरण स्पर्श (चरण म्हणजे ‘पाय’ आणि स्पर्श म्हणजे ‘स्पर्श’) असे म्हणतात. हिंदू परंपरेनुसार, जेव्हा तुम्ही एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या पायाला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि कीर्ती प्राप्त होते.

- Advertisement -

या संपूर्ण कृतीचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्यांनी या पृथ्वीवर तुमच्यापेक्षा जास्त काळ व्यतित केला आहे, तुमच्यापेक्षा जास्त काळ जगाचा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे आशिर्वादाच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या शुभेच्छा तुमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक आहेत.

पायांना स्पर्श करण्याचे आरोग्य फायदे

भारतीय विद्वानांच्या मते, पायांना स्पर्श करण्याचे तीन मार्ग आहेत. प्रथम पुढे वाकण्याचा आणि पायांना स्पर्श करण्याचा मूळ मार्ग आहे. दुसरे म्हणजे गुडघ्यावर बसणे आणि नंतर समोरच्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे. तिसऱ्या आणि शेवटचे तुम्ही पोटावर झोपणे आणि कपाळाला जमिनीला स्पर्श करणे, याला साष्टांग प्रणाम असेही म्हणतात, जे सामान्यतः हिंदू मंदिरांमध्ये भक्तांद्वारे केले जाते. हे सर्व चरण स्पर्शाचे प्रकार आहेत.

या संपूर्ण कृतीचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत त्यांनी या पृथ्वीवर तुमच्यापेक्षा जास्त काळ घालवला आहे, तुमच्यापेक्षा जास्त काळ जगला आहे . त्यामुळे त्यांना भरपूर ज्ञान आणि अनुभव मिळाले आहे. यामुळे त्यांचे आशिर्वाद लाभणे हे एक वरदान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -