Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeपावसाळ्यात कुकीज कुरकुरीत राहण्यासाठी खास टीप्स

पावसाळ्यात कुकीज कुरकुरीत राहण्यासाठी खास टीप्स

Subscribe

पावसाळ्यात वाफाळलेला चहा आणि गारवा याची मजा एक वेगळीच असते. याचसोबत बिस्किट्स किंवा कुकीज ही आवडीने खाल्ल्या जातात. घरी आलेल्या पाहुण्यांना असो किंवा मुलांना बिस्किट्स देण्यासाठी त्याचे पॅकेट उघडतोच. अशातच पॅकेट उघडल्यानंतर त्यामधील कुकीज काही वेळेस नरम पडतात. अथवा त्याची टेस्ट बिघडली जाते.

सर्वाधिक समस्या अशावेळी होते जेव्हा कुकीज किंवा बिस्किट्स महागडे असतात. अशा कुकीज कुरकुरीत पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभर तुम्ही पुढील काही टीप्सने फ्रेश ठेवू शकता.

- Advertisement -

-हवाबंद डब्यात ठेवा


हवाबंद डब्यात कुकीज किंवा बिस्किट्स ठेवल्याने ते दीर्घकाळ फ्रेज राहतात. पॅकेट उघडल्यानंतर ते लगेच हवाबंद डब्यात ठेवून थंड आणि ड्राय ठिकाणी ठेवल्यास दीर्घकाळ टिकतात.

- Advertisement -

-टिश्यूचा वापर करा


टिश्यूचा वापर करुन कुकीज व्यवस्थितीत ठेवल्या तर त्या लवकर खराब होत नाहीत. अशातच पावसाळ्यात कुकीज डब्ब्यात स्टोर करण्यापूर्वी ते एका टिश्यूमध्ये व्यवस्थिती रॅप करा.

-फ्रिजमध्ये स्टोर करा


बहुतांश लोकांना हे माहिती नसते की, बिस्किट किंवा कुकिज फ्रिजमध्ये स्टोर करून ते दीर्घकाळ टिकू शकतात. यासाठी तुम्ही एक झिपलॉक बॅग घेऊन त्यात तुमच्या कुकीज ठेवा. यामुळे कुकीजचा कुरकुरेपणा टिकून राहतो.

-सॉफ्ट कुकीज पुन्हा अशा करा कुरकुरीत


जर पॅकेट खुप वेळ उघडे राहिले तर त्यामधील कुकीज नरम होतात. अशातच पुन्हा ते कुरकुरीत करण्यासाठी तुम्ही ओव्हन किंवा एअर फ्रायरमध्ये 5-10 मिनिटे बेक करा.


हेही वाचा- Recipes : ‘या’ पावसाळ्यात बनवा ग्रीन fried rice

- Advertisment -

Manini