घरमहाराष्ट्रनागपूरधक्कादायक! चहा-बिस्किट मिळाले नाही म्हणून डॉक्टरने शस्रक्रिया सोडली; चौकशीचे आदेश

धक्कादायक! चहा-बिस्किट मिळाले नाही म्हणून डॉक्टरने शस्रक्रिया सोडली; चौकशीचे आदेश

Subscribe

नागपूर : जगातील सर्वाधित चहा उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत भारतचा क्रमांक दुसरा लागतो. त्याचबरोबर भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे. आपल्या देशाच्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एक तरी चहाची टपरी असते आणि त्या टपरीवर चहा पिणाऱ्यांनी पिणारे लोक दिसतील. चहा-बिस्किट मिळाले नाही म्हणून डॉक्टरांनी ऑपरेशन न केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्राची नागपूरमध्ये घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यानंतर महिलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वरिष्ठांनी दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था केली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना चौकशी करण्याचे मौखिक आदेश दिले आहे. यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती तीन दिवसात अहवाल सादर करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …तर समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला का केला? गडकरींसह एकनाथ शिंदेंना खासदाराचा सवाल

नेमके काय आहे

नागपूरच्या मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. डॉक्टरने 3 नोव्हेंबर रोजी कुटुंबनियोजनासाठी आठ महिलांवर शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. यानंतर चार महिलांना भूल दिल्यानंतर शस्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांनी नकार दिला. या मागेचे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल की, डॉक्टराला चहा-बिस्किट मिळाले नाही म्हणून शस्रक्रियेस नकार निघून गेल्याची माहिती मिळाली. या डॉक्टरांचे नाव डॉ. तेजराम भलावे असे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रायगड जिल्ह्यात सुपारी संशोधन केंद्र उभारणार; कृषिमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा

डॉक्टराने दिले स्पष्टीकरण

या प्रकरणी डॉ. डॉ. तेजराम भलावेंनी स्पष्टीकरण देत म्हणाले, “आपल्याला मधुमेह असून वेळेवर चहा बिस्किटे लागतात. ती मिळाली नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण खालवते आणि रक्तदाबही खालवला. यामुळे मी तेथून निघावे लागले, असे स्पष्टीकरण डॉक्टरांनी वरिष्टांना दिल्याची माहिती मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -