Saturday, April 20, 2024
घरमानिनीपैशांचे महत्व कळण्यासाठी मुलांना द्यावा पॉकेटमनी

पैशांचे महत्व कळण्यासाठी मुलांना द्यावा पॉकेटमनी

Subscribe

मुलांना उत्तम सवयी लागाव्या अशी प्रत्येक पालकाची सवय असते. यासाठी पालक मुलांच्या वागण्याबोलण्याकडे बारकाईने लक्ष देतात आणि त्यांना योग्य वळण लावण्याचा प्रयन्त करतात. पण यासर्वांसोबत मुलांना लहान वयातच पैशाचे महत्व समजावून सांगणे देखील महत्वाचे असते. मुलांना पॉकेटमनी देणे ही देखील एक उत्तम सवय आहे. पण, अनेक पालकांच्या मते ही सवय मुलांना बिघडण्यास कारणीभूत ठरते. पण, प्रत्येकवेळी तसे होते असे नाही. मुलांना पॉकेटमनी देताना योग्य खबरदारी घेतल्यास ती मुलांसाठी फायदेशीर ठरू शकते.

पैशाचे व्यवस्थापन – जेव्हा पालक पॉकेटमनी देण्यास सुरुवात करतात, तेव्हा त्यांना भीती असते की, मूल पैसे वाया घालवेल. पण प्रत्यक्षात हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही त्याला जास्त पैसे देता. याउलट जर तुम्ही मुलांना कमी पैसे दिलेत तर तो हळूहळू पैशाचे व्यवस्थापन करायला शिकेल.

- Advertisement -

बचतीची सवय – जेव्हा मुलाला जास्त पॉकेटमनी मिळू लागते तेव्हा तो पैसे वाया घालवू लागतो, पण जर तुम्ही त्याला योग्य पैसे खिशात ठेवले तर हळूहळू तो त्यांना मॅनेज करायला शिकेल. अशाने तो पैशाची बचत कशी करायची हे आपसूकच शिकेल.

- Advertisement -

चुकांमुळे शिकेल – जेव्हा मुलाला पहिल्यांदा पॉकेटमनी मिळू लागतो, तेव्हा सुरुवातील त्याच्याकडून काही चुका होऊ शकतात. पण, कालांतराने, मुलांना गोष्टी समजू लागतील आणि पैशाचे महत्व कळेल. त्यामुळे मुलांना पॉकेट्मनीमध्ये योग्य पैसे द्यावेत, जेणेकरून ते चुकांमधून शिकतील.

योग्यप्रकारे वापरण्यास शिकवा – मुलांना पैशांचे महत्व समजावून सांगणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. पैसे कमविण्यासाठी अथक परिश्रम लागतात त्यामुळे त्याचा वापर करताना तो योग्य ठिकाणी आणि योग्यरीत्या होणे आवश्यक असते हे मुलांना पटवून देणे गरजेचे आहे. पैशांचा योग्य वापर करायला शिकल्याने मुलांना भविष्यात पैशांचा योग्य वापर करण्यात अडचण येत नाही. अशाने भविष्यात ते कमी पैशात मोठी कामे करू शकतात आणि जास्तीत जास्त पैशांची बचत करू शकतील.

 

 

 


हेही वाचा : मुलांना लैंगिक सुरक्षिततेसाठी शिकवा या गोष्टी

 

- Advertisment -

Manini