Friday, April 26, 2024
घरमानिनीमुलांना लैंगिक सुरक्षिततेसाठी शिकवा या गोष्टी

मुलांना लैंगिक सुरक्षिततेसाठी शिकवा या गोष्टी

Subscribe

घराघरात मुलांना पाणी सुरक्षा, रस्ता सुरक्षा आणि इतर गोष्टींबाबत सावधिगिरी बाळगण्यास शिकविले जाते. पण, दुर्दैवाने मुलांना स्वतःच्या शरीराविषयी आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शिकविण्यास आपण विसरतो. आपल्या मुलाचे शारीरिक स्वाथ्य ही महत्वाची गोष्ट आहे हे आपल्याला माहित असले तरीही पालक त्यांना त्यांच्या शरिराबद्दल माहिती देण्यास आणि लैंगिक सुरक्षिततेसाठी माहिती देण्यास अपयशी ठरतात. वाढत्या वयातील मुलांना लैंगिक सुरक्षिततेच्या गोष्टी सांगणे अतंत्य महत्वाचे आहे आणि हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे.

गुड टच बॅड टच शिकवा –
तुमच्या मुलांना गुड टच आणि बॅड टच अवश्य शिकवा विशेष करून मुलींना. मुलींना सगळ्यात आधी त्यांच्या अवयवांविषयी माहिती द्या. पालकांनी हे सांगणे गरजेचे आहे की, जर एखादा व्यक्ती तुमच्या प्रायव्हेट पार्टला
स्पर्श करण्याचा प्रयन्त करत असेल तर त्याचा विरोध करायला हवा. असे कोणी करत असेल तर घाबरून शांत न बसता मुलींना आवाज उठवण्यास पालकांनी शिकवायला हवे.

- Advertisement -

अधिकार –
आपल्या मुलांना समंतीच्या महत्वाबद्दल शिक्षित करणे आणि त्यांना समजून घेण्यास सक्षम करणे महत्वाचे आहे की कोणतेही बॅड टच नाकारण्याचा अधिकार त्यांना आहे, मग समोरची व्यक्ती कुटुंबातील सदस्य असो किंवा विश्वासू कोणीही.

मनमोकळेपणाने बोला –
पालकांनी कायम प्रत्येक गोष्टीबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे आणि मुलांना शिव्या न देता किंवा आरडाओरडा न करता त्यांचेही म्हणणे ऐकले पाहिजे. अशाने मुले न घाबरता तुमच्याशी बोलू शकतील. त्याच्यासोबत काही अनुचित घटना घडत असतील तर अशाने वेळीच तुम्हाला समजेल.

- Advertisement -

गुप्तता ठेऊ नये –
शारीरिक अस्वस्थता गुप्त ठेवणे योग्य नाही आणि बहुतेक लोक मुलांवर अन्याय करतात आणि झालेल्या वाईट घटना, गोष्टी मुलांना गुप्त ठेवण्यास सांगतात. काही जण मुलांसोबत चुकीचा व्यवहार करतात आणि मुलांना गप्प राहण्यास सांगतात. त्यामुळे पालकांनी वाढत्या वयातील मुलांसोबत वागताना त्याच्या मित्रमंडळीसारखे वागावे. ज्याने मुले तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतील.

 

 

 


हेही वाचा : मुलींना वाढविताना मुलींमधील स्त्रीपण जपणे महत्वाचे

 

- Advertisment -

Manini