कूल हेअरस्टाईल

कूल हेअरस्टाईल

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेप्रमाणेच केसांचे आरोग्य सांभाळणे गरजेचे असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणार्‍या घामामुळे केस मानेवर सुटे ठेवणे कठीण जाते. तेव्हा या उन्हाळ्याच्या दिवसात केसांचे आरोग्य राखणार्‍या कूल हेअरस्टाईल जाणून घेऊयात…

पोनीटेल – उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात सोपी आणि कूल हेअरस्टाईल म्हणून आपण पोनीटेल स्टाईल निवडू शकतो. या दिवसात कार्यालयात किंवा फिरायला जायचे असल्यास केसांचा पोनीटेल एक वेगळाच कॅज्युअल लुक देतो. तसेच काही हेअर पिन्सच्या साहाय्याने आपण सिम्पल पोनीटेलला आकर्षक लूकसुद्धा देऊ शकतो.

केसांची वेणी घाला – पूर्वी आईकडून मुलींना केसांची वेणीच घाल म्हणून हट्ट केला जात असे. मात्र, मुलींना वेणी घालणे आऊट ऑफ फॅशन वाटते, पण वेगवेगळ्या पद्धतीने केसांची वेणी घातल्यास कूल लूक प्राप्त होतो. तसेच वेणी घातल्याने केसांची निगा राखण्यास मदत होते.

बन (आंबाडा) – मागील काही दिवसात बॉलीवूड अभिनेत्रींनी आऊट ऑफ फॅशन गेलेल्या बन (आंबाडा) या हेअरस्टाईलला पुन्हा इन फॅशन केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात लग्नसमारंभात जायचे असल्यास केसांचा बन (आंबाडा) घालू शकता. तसेच कार्यालयीन पेहेरावातसुद्धा केसांचा बन (आंबाडा) ही हेअरस्टाईल कूल लूक देते.

हाल्फ बन, पोनीटेल – अनेकदा महिलांना उन्हाळ्याचे दिवस असले तरी केसांचा पोनीटेल किंवा वेणी घालणे आवडत नाही, पण कडक उन्हात बाहेर पडायचे असल्यास पूर्ण मोकळे सोडलेले केस सांभाळणे कठीण होते. अशावेळी केसांचा हाल्फ बन किंवा हाल्फ पोनीटेल बांधून उन्हाळ्याच्या दिवसात हटके लूक मिळवू शकतो.

First Published on: April 22, 2019 4:59 AM
Exit mobile version