Sunday, May 5, 2024
घरमानिनीजेवणानंतर चुकूनही करु नका 'या' चुका; नाहीतर भोगावे लागतील 'हे' गंभीर परिणाम

जेवणानंतर चुकूनही करु नका ‘या’ चुका; नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

Subscribe

हेल्दी राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम देखील अत्यंत महत्वाचा आहे. अनेकजण रोज व्यायाम देखील करतात आणि योग्या आहार देखील घेतात. परंतु असं असूनही त्यांना दिवसभर थकवा जाणवतो. असं होत असल्यास तुमच्याकडून नक्की कोणती चुक होते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जेवणानंतर चुकूनही करु नका ‘या’ चुका

- Advertisement -
  • जेवल्यानंतर लगेच झोपू नका


अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपायची सवय असते. दिवसा झोपल्यावर शरीरामध्ये आळस निर्माण होतो आणि त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. जेवणानंतर झोपल्याने पोटामधील पाचन रस वरच्या दिशेला येतो आणि यामुळेच अॅसिडीचा त्रास होऊ शकतो.

  • जेवल्यानंतर जास्त पाणी पिऊ नका


अनेकजण जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पितात. मात्र जेवल्यानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने जेवण पचायला त्रास होऊ शकतो.

- Advertisement -
  • चहा किंवा कॉफी पिऊ नका


काही लोकांना जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणं पसंत करतात. मात्र ही सवय शरीरासाठी अत्यंत घातक आहे. चहा आणि कॉफीमध्ये फेनोलिक कम्पाउंड असते.

  • जेवल्यानंतर लगेच अंघोळ करु नका


जेवल्यानंतर लगेच अंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते. ज्यामुळे जेवण पचायला त्रास होतो.

 


हेही वाचा :

चमकदार त्वचेसाठी अशा पद्धतीने करा बिटाचा वापर

- Advertisment -

Manini