आता लवकरच हिवाळ्याची चाहूल लागेल. हिवाळा ऋतू अनेकांचा आवडीचा असला तरी हिवाळ्यातील थंडीमुळे अनेकांची त्वचा रुक्ष आणि कोरडी पडते. अशावेळी आम्ही तुमच्यासाठी खास टीप्स घेऊन आलो आहोत. यामुळे तुम्ही अगदी सोप्या साध्या पद्धतीने तुमची त्वचा सुरक्षित ठेवू शकाल.
हिवाळ्यात त्वचा अशी ठेवा निरोगी
- नियमित पाणी प्या
थंड वाऱ्यामुळे त्वचा पूर्णपणे कोरडी आणि निर्जीव बनते. अशावेळी बॉडी लोशन आणि कोल्ड क्रीम लावूनही त्वचा निर्जीव दिसते. खरं तर, हिवाळ्यात त्वचेला केवळ बाह्य मॉइश्चरायझरची गरज नसते, तर अंतर्गत हायड्रेशनचीही गरज असते. जेणेकरून त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. कमी पाणी पिणे हे देखील हिवाळ्यात त्वचा निस्तेज दिसण्याचे एक कारण आहे. हिवाळ्यात तापमान इतके कमी असते की तहान लागत नाही. मात्र बराच वेळ पाणी न पिल्याने अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे शरीराच्या आरोग्यासाठी तसेच त्वचेच्या सौंदर्यासाठी नियमित पाणी प्यावे, जेणेकरून तुमची त्वचा ताजीतवानी राहील.
- सूप
हिवाळ्यात आपल्याला काहीतरी तिखट झणझणीत आणि गरम खावंसं वाटतं. अशावेळी तुम्ही छान गरमा गरम सूप बनवू शकता. सूप प्यायल्याने पोट निरोगी राहते. यासोबतच ते शरीराला हायड्रेट करते. जेवणापूर्वी एक वाटी भाजीचं सूप प्यायल्याने तुम्ही हायड्रेटेड राहाल.
- ग्रीन ज्यूस
फळे आणि भाज्यांपासून तयार केलेले रस शरीराला हायड्रेट करते आणि त्वचा उजळते. त्यामुळे तुमचे शरीर निरोगी आणि सुंदर बनवायचे असेल तर ग्रीन ज्यूस खूप महत्त्वाचा आहे. नियमित ग्रीन ज्युसमुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
- लिंबू पाणी
लिंबू पाण्यामुळे पचनशक्ती योग्य राहण्यासोबतच त्वचेला फायदा होतो. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले हे पेय तुम्हाला हायड्रेट
- हळदीचे दूध
‘गोल्डन मिल्क’ या नावाने जवळपास प्रत्येक घरात प्रसिद्ध असलेले हळदीचे दूध खूप फायदेशीर असतं. दुधात चिमूटभर हळद टाकल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण चांगल्या झोपेसाठीही ते आवश्यक आहे.
हेही वाचा :