इकोफ्रेंडली होळी करा साजरी

इकोफ्रेंडली होळी करा साजरी

रंगीबेरंगी रंगाची उधळण करणारा सण होळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सणच रंगांचा असल्याने तुमच्या आमच्यावर रंगाची उधळण तर होणारच. याचपार्श्वभूमीवर बाजारात इकोफ्रेंडली रंगांची मागणी वाढली आहे. यामुळे अनेक रंगविक्रेते याचाच गैरफायदा घेत भेसळयुक्त रंग इकोफ्रेंडली असल्याचे सांगत विकत आहेत. पण हे भेसळयुक्त रंग कसे ओळखायचे आणि काय काळजी घ्यायची त्याबद्दल काही टिप्स.

इकोफ्रेंडली रंग कसे ओळखाल ?

इकोफ्रेंडली रंग विकत घेताना नेहमी पाकिटावर छापलेली माहिती वाचूनच रंग विकत घ्या.
1- इकोफ्रेंडली रंग हे नेहमी बंद पाकिटामध्ये असतात.
2-या रंगाला सुगंधीत फुलांचा सुवास असतो.
3- पाकिटावर प्रयोग शाळेत चाचणी केल्याचा क्रमांक लिहिलेला असतो.
4- रंग कोणत्या घटकांपासून तयार केले आहेत याची माहिती त्या पाकिटावर दिलेली असते.

होळीला रंग खेळताना अशी घ्या काळजी .
1- रंग खेळायला जाताना नेहमी जुने कपडे घालून जा.
2- रंग खेळताना शक्यतो इकोफ्रेंडली रंगांचा वापर करा.
3- पाण्याचा अपव्यय टाळा.
4- सुक्या रंगांचा वापर करा.
5- रंग खेळण्याआधी हात, पाय आणि केसांना खोबऱ्यांचे तेल लावून बाहेर पडा. जेणेकरून रंगांची एलर्जी होणार नाही.
6- रंग खेळताना अंगभर कपडे घालून बाहेर पडा.

First Published on: March 5, 2020 7:02 PM
Exit mobile version