Monday, April 29, 2024
घरमानिनीदाट 'आयब्रो'साठी वापरा या टीप्स

दाट ‘आयब्रो’साठी वापरा या टीप्स

Subscribe

किचनमधील काही नैसर्गिक पदार्थ वापरूनही तुमच्या विरळ असलेल्या आयब्रो दाट होऊ शकतात.

जसे डोळ्यांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते तसेच आयब्रोमुळेही चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलते. यामुळे आयब्रो दाट करण्यासाठी अनेकजणी पेन्सिलचा वापर करतात. पण पेन्सिल जास्त काळ टिकत नाहीत. यामुळे पुन्हा पुन्हा आयब्रोवरून पेन्सिल फिरवावी लागते.

- Advertisement -

पण तुम्हांला माहित आहे का किचनमधील काही पदार्थ वापरूनही तुमच्या विरळ असलेल्या आयब्रो नैसर्गिकपणे दाट होऊ शकतात.

- Advertisement -

नारळाचे तेल

जर तुमच्या आयब्रो विरळ असतील तर त्यावर तुम्ही नारळाचे तेल लावू शकता. नारळाच्या तेलात मुबलक प्रमाणात विटामीन ई असते. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे विरळ आयब्रोही दाट होतात. त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कापसाचा बोळा नारळाच्या तेलात भिजवून घ्यावा. नंतर तो आयब्रोवर फिरवावा.

एरंडेल तेल
एरंडेल तेलामध्ये भरपूर प्रमाणात फॅटी एसिड असते. अशावेळी जर तुम्ही आयब्रोवर एरंडेल तेल लावले तर आयब्रो दाट होतात. त्यासाठी बोटावर किंवा ब्रशवर एरंडेल तेलाचे ड्रॉप टाकावे. नंतर ते आयब्रोवरून फिरवावे. अर्धा तासानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. हा प्रयोग रोज केल्याने लवकर फायदा होतो.

मात्र यावेळी डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. डोळ्याजवळची त्वचा नाजूक असते. यामुळे कोणतेही तेल डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.

 

- Advertisment -

Manini