Tuesday, May 14, 2024
घरमानिनीHealthसुदृढ आयुष्य जगण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

सुदृढ आयुष्य जगण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Subscribe

आनंदी आयुष्य जगण्यासाठी पैसा, प्रेम, यश यासोबतच आरोग्य उत्तम असणं देखील गरजेचं आहे. बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खूपवेळ एका जागी बसून काम करण्याची पद्धत यामुळे आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. आपल्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणांमाचा सामना करायचा नसेल तर आजपासूनच हे उपाय जरूर करा. रोजच्या सवयीत हे बदल केल्यास तुम्ही नेहमी हेल्दी राहाल.

हेल्दी आयुष्य जगण्यासाठी करा ‘हे’ उपाय

  • सकाळी लवकर उठा

10 reasons you should wake up at 5 AM for 30 days straight

- Advertisement -

सकाळी लवकर उठल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. सकाळच्या वेळी असणाऱ्या हवेतील ऑक्सिजन आरोग्यास लाभदायक असतो. तसेच लवकर उठून कोवळ्या उन्हात फिरल्यास हाडांच्या समस्या उद्भवणार नाही.

  • योगासाधना करणं आवश्यक

What Happens To Your Body If You Meditate Everyday

- Advertisement -

सकाळी उठल्यानंतर काही वेळ व्यायाम, योगा करणे आवश्यक आहे. शरिर उत्तम राहण्यासाठी कमीत कमी 30 मिनिटे व्यायम करा.

  • पचनक्रिया उत्तम ठेवा

13 Surprising Benefits of Walking After Dinner

 

जर तुम्हाला उत्तम निरोगी आयुष्य हवे असेल तर तुमची पचनक्रिया सुदृढ असणे आवश्यक असते. जेवण झाल्यानंतर लगेच झोपणे टाळा. जेवल्यानंतर काही वेळ चालल्यास अन्न पचणास मदत होईल.

  • खाण्याच्या पिण्याच्या सवयींवर लक्ष

The Timing of Your Meals Can Affect Weight Loss, Says Science

गरजेपेक्षा अधिक खाणं हे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे शारिरीक हालचालींसाठी आपले डाएट योग्य असणे आवश्यक असते. अशावेळी कमी आणि हलके अन्न खा. योग्यरित्या पचलेले अन्न तुमचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करेल. यामुळे अतिरिक्त फॅट वाढण्यावर नियंत्रण मिळेल.

  • सकाळच्या नाश्तात फळांचा समावेश

Learn The Art Of Eating Fruits Correctly

सकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्या. नाश्त्यात व्हिटॅमीन, प्रोटीन, फायबर, ओमेगा-3 घटक असणाऱ्या फळांचा समावेश करा. यामध्ये फळांचा जास्त समावेश असावा.

 


हेही वाचा :

तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरणं शरीरासाठी घातक

- Advertisment -

Manini