Friday, May 17, 2024
घरमानिनीHealth'ग्लूटेन फ्री डाईट' म्हणजे काय?

‘ग्लूटेन फ्री डाईट’ म्हणजे काय?

Subscribe

दिवसेंदिवस ‘ग्लूटेन फ्री डाईट’चा ट्रेंड हा वाढत चालला आहे. ग्लूटेन फ्री डाईटचे शरीराला अनेक फायदे आहेत. आजकालच्या बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत. अशावेळी ‘ग्लूटेन फ्री डाईट’ आरोग्यसाठी उपयुक्त मानण्यात येतो. याशिवाय सांधेदुखी, मानसिक आणि शारीरिक अस्वस्थतेसाठीही हा डाईट फायदेशीर ठरला आहे.

‘ग्लूटेन फ्री डाईट’ म्हणजे काय?
ग्लूटेन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. जे गहू, राई सारख्या धान्यांमध्ये आढळतो. आजकाल झटपट वजन कमी करण्यासाठी अनेकजण या डाईटची मदत घेत आहेत. ग्लूटेन फ्री डाईट तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढविण्यासाठी फायदेशीर आहे.

- Advertisement -

ग्लूटेन फ्री डाईटमध्ये कोणते पदार्थ येतात?

‘ग्लूटेन फ्री’ असे अनेक पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. यात तुम्ही गव्हाऐवजी कॉर्नस्टार्च, बटाटयाचे पीठ किंवा सोया पीठही वापरू शकता. याशिवाय तुम्ही बीन्स, टोफू, सोयाबीन आणि शेंगदाणे व्हेज आहाराचा भाग बनवू शकता. तर नॉनव्हेजमध्ये मासे, मांस आणि अंडी खाऊ शकता. फळांचा विचार केल्यास तुम्ही सर्व फळे खाऊ शकता. तर भाज्यांमध्ये हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता.

- Advertisement -

‘ग्लूटेन फ्री डाईट’चे फायदे कोणते?

एनर्जी बूस्टर – गव्हाच्या सेवनाने शरीर सुस्त आणि आळशी बनते. जर तुम्ही ‘ग्लूटेन फ्री डाईट’ फॉलो केल्यास तुम्हाला थकवा जाणवत नाही.

निरोगी त्वचा – ग्लूटेन फ्री डाईटमुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी मदत मिळते. त्वचा चमकदार होते आणि त्वचेसंबंधी आजार कमी होतात.

पचनक्रिया सुधारते – गॅस, बद्धकोष्ठता, पोट फुगणे किंवा अतिसार यासारख्या समस्यांनी जर तुम्ही ग्रस्त असाल तर ग्लूटेन फ्री पदार्थांचा आहारात समावेश करा.

वजन कमी करणे – बहुतेक जण वजन कमी करण्यासाठी ग्लूटेन फ्री डाईट फॉलो करतात. या पदार्थांमध्ये कमी कॅलरीज असतात ज्याने वजन कमी करण्यास मदत होते.

 

 


हेही वाचा ; PCOS ग्रस्त महिलांनी ‘ही’ फळे अवश्य खावीत

 

- Advertisment -

Manini