Friday, May 3, 2024
घरमानिनीHealthतळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरणं शरीरासाठी घातक

तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरणं शरीरासाठी घातक

Subscribe

अनेकदा वडे, भजी, पापड असे पदार्थ तळताना जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. मात्र, हे पदार्थ तळून झाल्यानंतर तेल कढईमध्ये उरते यावर उपाय म्हणून अनेक महिला हे उरलेलं तेल इतर भाज्यांसाठी किंवा पोळ्या करताना वापरतात. पण असं वारंवार करणं आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कडवलेल्या तेलाचा पुन्हा-पुन्हा वापर केल्याने गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. हेल्द एक्सपर्ट्सच्या मते, एकदा वापरलेलं तेल पुन्हा गरम केल्यास त्यामधून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि या तेलाचे इतर कोणत्याही खाद्यपदार्थांमध्ये वापर केल्यास शरीरात फ्री रेडिकल्स वाढू लागतात. यामुळे शरिरावर सूजन येणे तसेत अनेक प्रकारच्या आजारांना सामना करावा लागू शकतो.

How to reuse and dispose of cooking oil - The Washington Post

- Advertisement -
  • प्रत्येक वेळी तेल गरम करताना तेलातून फॅट पार्टिकल्स तूटायला सुरूवात होते. यामुळे तेल स्मोक पॉईंटची सिमा गाठू लागतो. तसेच याचा वारंवार उपयोग केल्याने यातून वास येण्यास सुरूवात होते.
  • तळलेले तेल पुन्हा वापरल्याने तणाव, उच्च रक्तदाब आणि एथेरोस्क्लेरोसिस होऊ शकते. तसेच एकच तेल वारंवार गरम करून ते खाल्ल्याने अॅसिडिटी, कॅन्सर आणि अल्झायमरसह अनेक समस्या उद्भवू शकतात.
  • तळलेल्या तेलाचा वापर केल्यास शरीरात ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढतो. यामुळे शरीरात फ्री रेडिकल वाढतात. यासोबतच लिव्हर, किडणी आणि फुफ्फुसांचे आजार वाढतात.
  • तळलेल्या तेलामध्ये असलेल्या काही चरबीचे ट्रान्स फॅटमध्ये रूपांतर होते जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे हृदयविकारही होऊ शकतो.
उरलेल्या तेलाचा असा करा वापर

Aloo Samosa (Samosa Stuffed With Spiced Potato and Peas) Recipe

 

- Advertisement -

 

  • तळण्याचे तेल पुन्हा वापरण्यासाठी, ते चांगले फिल्टर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्व जळलेले अन्नाचे कण काढून टाकले जातील.
  • तळलेले तेल दोन दिवसातच वापरावे. तसेच तळण्यासाठी नेहमी स्टीलचे भांडे वापरावे.
  • जर तुम्हाला तेल पुन्हा वापरण्या योग्य ठेवायचे असेल तर ते कमी तापमानातच वापरा.जेणेकरून तेलातून धूर निघणार नाही.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini