Tuesday, May 7, 2024
घरमानिनीKitchenमसाला फ्रेश राहण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक

मसाला फ्रेश राहण्यासाठी वापरा ‘ही’ ट्रिक

Subscribe

एखादी भाजी तयार करण्यासाठी अर्धावेळ तर त्याची ग्रेवी बनवण्यासाठी जातो. खासकरून ऑफिससाठी उशिर होतो तेव्हा आपण सकाळी उठून व्यवस्थितीत लंच तयार करू शकत नाहीत. अशातच एक सोप्पी ट्रिक तुम्ही वापरू शकता.ग्रेवीला डीप फ्रिज करुन आइस क्यूब मध्ये रुपांतर केले जाते. त्यानंतर जेव्हा कधी पदार्थ तयार करायचा असेल तेव्हा पॅन मध्ये गरम करुन खाता येते.

Gravy bombs are the ultimate Thanksgiving potluck side

- Advertisement -

साहित्य-
तेल चार चमचे
दोन काळी वेलची
तीन हिरवी वेलची
तीन लवंग
एक इंच दालचिनी
7-8 काळी मिरी
7 कांदे
15 लसूण
6 टोमॅटो
12-15 भिजलेले काजू
3-4 भिजवलेली कश्मीरी मिर्ची

मसाल्यासाठी
दोन चमचे तेल
धणे पावडर पाच चमचे
दोन चमचे गरम मसाला
तीन चमचे लाल मिर्ची
दोन चमचे जीर पावडर
तीन चमचे हळद

- Advertisement -

सर्वात प्रथम गॅसवर एक पॅन ठेवा. त्यात तेल टाकून ते गरम करा. गरम झाल्यानंतर त्यात वेलची, हिरवी वेलची, लवंग, दालचिनी आणि काळी मिर्ची टाकून हलकी भाजून घ्या. त्यानंतर त्यात लसूण, कांदा, टोमॅटो, काजू आणि कश्मीरी लाल मिर्ची मोठ्या आकारात कापून फ्राय करा. सर्व गोष्टी व्यवस्थितीत भाजून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करा.

थंड केल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ते बारीक करून घ्या. त्यानंतर गॅसवर पुन्हा एक पॅन ठेवा आणि त्यात दोन चमचे तेल टाकून गरम करा. तेल गरम केल्यानंतर तयार केलेली पेस्ट टाकून पुन्हा शिजवा. त्यात धणे पावडर, गरम मसाला, लाल मिर्ची पावडर, जीर पावडर आणि हळद टाकून व्यवस्थितीत शिजवा.

जेव्हा ग्रेवी व्यवस्थितीत तयार होईल तेव्हा एका बाउलमध्ये काढून थंड करा आणि ते एका आइस ट्रे मध्ये टाकून सेट करा. फ्रीजरमध्ये 4-5 तास फ्रीज करा. अशी ग्रेवी तुम्ही दीर्घकाळ स्टोर करू शकता.


हेही वाचा- Recipe : चटपटीत टोमॅटो कोथिंबीर चटणी

 

- Advertisment -

Manini