Monday, December 4, 2023
घरमानिनीफ्रिजवर असलेले डाग असे घालवा

फ्रिजवर असलेले डाग असे घालवा

Subscribe

फ्रीज अशी गोष्ट आहे ज्याला आपण सतत हात लावत असतो. तसेच फ्रीज आपण सारखा पुसत नाही. काही खास दिवस असेल किंवा सणासुदीलाचा फ्रीज आपण साफ करतो. तसेच आपण फ्रीजचा रोज पूर्णपणे वापर करतो. पण त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. फ्रीज स्वच्छ ठेवणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

आपण फ्रीजमध्ये अनेक पदार्थ साठवतो आणि जर फ्रीज साफ केला नाही तर त्याचा अस्वच्छतेमुळे फ्रीजमध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया जमा होतात, ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका असतो. तसेच फ्रीज साफ करणे हे बऱ्याच लोकांना खूप कठीण काम वाटते. अशातच आता आपण फ्रीज स्वच्छ करण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्स च्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत फ्रीजला नवीनसारखा चमकवू शकता.

- Advertisement -

Cleaning Fridge Images – Browse 39,821 Stock Photos, Vectors, and Video |  Adobe Stock

1. सर्वप्रथम फ्रीज रिकामा करा

- Advertisement -

फ्रीज स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम फ्रीज पूर्णपणे रिकामा करा. तसेच फ्रीजच्या दरवाजाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या वस्तू बाहेर काढा. एवढेच नाही तर साफसफाई करण्यापूर्वी फ्रीजचा मेन प्लग स्विच बोर्डमधून काढून टाका.

2. बेकिंग सोडा वापरा

अनेक वेळा मसाले, भाज्या इत्यादींचे डाग फ्रीजमध्ये तसेच राहतात. ते काढून टाकण्यासाठी, एक कप पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा डिटर्जंट घाला आणि हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरा. नंतर हे मिश्रण फ्रीजवर स्प्रे करा आणि कोरड्या कापडाने फ्रीज पुसून घ्या. यामुळे फ्रिज झटपट चमकेल. आणि त्यावरचे चिकट डाग सुद्धा लगेच निघून जातील.

3. व्हाईट व्हिनेगर वापरा

फ्रीजचे दरवाजे, त्याचे कप्पे,आणि बास्केट यासारख्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी व्हाईट व्हिनेगरचा वापर करा. यासाठी एक कप पाण्यात तीन ते चार चमचे व्हिनेगर मिसळा आणि त्यात कपडा बुडवा. त्यानंतर फ्रीजचा दरवाजा, शेल्फ, ड्रॉवर आणि बास्केट या कापडाने स्वच्छ करा. यामुळे काही मिनिटांत घाण निघून जाईल.

4. फ्रीज नीट सुक्कवा

फ्रीज साफ केल्यानंतर, तो व्यवस्थित सुकणे देखील आवश्यक आहे. कारण फ्रीजमध्ये ओलावा राहिल्याने त्यामध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू शकतात. म्हणूनच फ्रीजमध्ये सामान ठेवण्यापूर्वी, कोरड्या सुती कापडाने ते पूर्णपणे पुसून घ्या आणि ते कोरडे असल्याची खात्री करा. यानंतरच फ्रीज चालू करा.

_______________________________________________________________________हे

ही वाचा :

- Advertisment -

Manini