घरलाईफस्टाईलवूलन कुर्ती कशी धुवाल?

वूलन कुर्ती कशी धुवाल?

Subscribe

वूलन कुर्ती हा हिवाळ्यातील ट्रेंड होत आहे. यामुळे बाजारात विविध प्रकारचे लोकरीच्या कुर्त्याही उपलब्ध आहेत. आजकाल महिला हिवाळ्यात कम्फर्ट आणि स्टाइलमुळे लोकरी कुर्ती घालण्यास प्राधान्य देतात. पण लोकरीचे कुर्ते स्वच्छ करणे हे देखील एक टास्कच आहे.कारण लोकरीमुळे तुम्ही हे कुर्ते धुण्यासाठी ब्रशही वापरू शकत नाही.पण एक सोपा उपाय आहे जो ब्रशशिवाय लोकरीचे कुर्ते स्वच्छ करण्यास उपयोगी आहे.

सॅनिटायझर

- Advertisement -

आजकाल प्रत्येकाच्या घरी हँड सॅनिटायझर आहे. बॅक्टेरियाचा नाश करण्यापासून ते कपड्यांवरील डाग साफ करण्यासाठीही सॅनिटायजरचा उपयोग करता येतो.

लोकरीच्या कुर्तीचा डाग असलेला भाग पाण्यात भिजवा आणि त्यावर हँड सॅनिटायझर लावा.

- Advertisement -

हँड सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते आणि त्यामुळे ते कठीण डाग साफ करते.

यानंतर डागावर लिंबाचे थेंब टाका आणि ब्रश न करता लिंबाच्या सालीने डागाळलेला भाग घासून घ्या.

लिक्विड डिटर्जंट किंवा लिक्विड डिशवॉशर

लोकरीच्या कुर्तीचा फक्त तोच भाग पाण्यात भिजवा ज्यावर डाग आहेत.

त्यावर लिक्विड डिटर्जंट किंवा लिक्विड डिशवॉशर लावा.

आता डाग घासण्यासाठी टूथब्रश किंवा ओला टॉवेल वापरा.

पुन्हा लिक्विड डिटर्जंट किंवा लिक्विड डिशवॉश डागलेल्या भागावर टाका आणि रात्रभर तसेच राहू द्या.

सकाळी हलक्या हाताने चोळा आणि कुर्ता धुवा.

लिंबू आणि ग्लिसरीन

लिंबू आणि ग्लिसरीनने लोकरीच्या कुर्तीवरील हळदीचे डाग घालवता येतात
यासाठी डाग पडलेल्या भागावर ग्लिसरीन लावावे .
नंतर त्यावर लिंबाचे थेंब पिळून घ्यावे आणि नंतर लिंबाची साल चोळण्यासाठी वापरावी लागेल.
अशा प्रकारे तुम्ही हळदीच्या डागांपासून सहज सुटका मिळवू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -