Tuesday, May 14, 2024
घरमानिनीरुसलेल्या बायकोला 'असे' करा कंट्रोल

रुसलेल्या बायकोला ‘असे’ करा कंट्रोल

Subscribe

लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्या जातात. अशातच नवरा-मुलं आणि घरातील अन्य मंडळींना वेळोवेळी कसे खुश ठेवायचे याचाच प्रयत्न केला जातो. परंतु याच दरम्यान नवऱ्यासोबत भांडण झाले तर बायको काही तुमच्याशी बोलणे टाळते. अशातच रुसलेल्या बायकोला कसे कंट्रोल कराल याच बद्दलच्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-नाराजी जाणून घेण्याचा प्रयत्न करा
लग्नानंतर पार्टनरने एकमेकांचा स्वभाव जाणून घेणे फार गरजेचे आहे. काही वेळेस घरातील कामांमुळे बायको संतप्त होऊ शकते. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. त्याचसोबत एखाद्या गोष्टीवरुन ती तुमच्याशी नाराज असेल तर त्या नाराजीमागील कारण शोधा.

- Advertisement -

-आपली चूक मान्य करा
प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतात. पण तुमच्या एखाद्या चुकीमुळे बायको तुमच्यावर रुसली असेल तर चुक आधीच स्विकारा. जेणेकरुन तुमच्यातील वाद लवकर मिटेल.

- Advertisement -

-संयमाने घ्या
जर तुमची बायको अधिक रागावली असेल तर त्या जे काही करत आहेत त्यावर लगेच रिअॅक्ट करु नका. परंतु तुम्ही या उलट केल्यास तर बायकोचा राग अधिक वाढेल. अशातच तुम्ही तिला संयमाने घ्या. तिचा राग शांत झाला की, तिला नक्की काय झाले होते ते विचारा.

-कामात मदत करा
संपूर्ण दिवसभर काम करुन बायको थकते. अशातच तुम्ही तिला कामात मदत करु शकता. असे होऊ शकते की, घरातील कामात तुम्ही तिची मदत केल्यानंतर तिची चिडचिड कमी होईल. तुम्ही बायकोची काळजी घ्याल तर तिच्या स्वभावात बदल ही होईल.

-तिच्याकडे दुर्लक्ष करु नका
जर तुम्हाला वाटत असेल की, बायकोचा स्वभाव चिडका आहे तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. असे केल्यास अधिकच तुमच्यावर रुसेल. तिला शांत करण्याचा प्रयत्न करा. प्रेमाने समजवा.

 


हेही वाचा: पार्टनर तुमच्याव्यतिरिक्त आणखी कोणाशीतरी इमोशनली कनेक्टेड आहे? याचा अर्थ काय

- Advertisment -

Manini