Saturday, May 4, 2024
घरमानिनीतुम्ही सुद्धा जुन्या गोष्टींमुळे बैचेन राहता? अशा पद्धतीने हरवलेला आनंद परत आणा

तुम्ही सुद्धा जुन्या गोष्टींमुळे बैचेन राहता? अशा पद्धतीने हरवलेला आनंद परत आणा

Subscribe

तुमच्या चुकीच्या निर्णयांमुळे तुम्हाला आजचे आयुष्य वाईट स्थितीतून जात असल्यासारखे जाणवत असेल तर असे वाटणे सर्वसामान्यच आहे. कारण तुमच्या एका निर्णयामुळे तुम्ही एखाद्याला गमावता किंवा एखाद्याचे मन दुखावता, त्याचा परिणाम दीर्घकाळ आपल्या मनावर होतो. अशातच तुम्ही सुद्धा जुन्या गोष्टींमुळे सतत बैचेन राहत असाल तर नक्की काय करावे? गमावलेला आनंद परत कसा आणायचा याचबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

-लिस्ट तयार करा
जीक्युइंडियाच्या मते, चुकांमधून बाहेर पडण्यासाी त्या गोष्टींची लिस्ट तयार करा ज्यामधून तुम्ही काहीतरी शिकलात. खरंतर चुकीचे निर्णय हे आयुष्यात आपल्याला काहीतरी धडा शिकवतात. तुम्ही त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. जेणेकरुन भविष्यात होणाऱ्या चुकांपासून तुम्ही दूर रहाल. असे केल्याने तुम्हाला आयुष्यात निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास ही वाढेल.

- Advertisement -

-स्वत:ला माफ करा
तुम्ही केलेल्या चुकांमधून शिका आणि स्वत:ला माफ करुन पुढे जा. तिच चुक घेऊन पुढे जात रहाल तर नेहमीच नकारात्मक उर्जा तुमच्यात येत राहिल. त्यामुळे तु्म्हाला जर सकारात्मक आयुष्य जगायचे असेल तर स्वत:ला माफ करा आणि आनंदाने जगा.

-आपल्या चुकीबद्दल लिहा
तुम्ही तुमच्यामधील नकारात्मक भावना दूर करण्यासाठी त्या एका डायरीत लिहा. विचार करा की, असे केल्याने खरंच तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे का? जेव्हा तुम्ही असे करणे सुरु कराल आणि उत्तर मिळेल तेव्हा तुमचे मनं हलके होईल आणि तुम्हाला आनंदित वाटेल.

- Advertisement -

-या विषयावर बातचीत करा
जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला चुकांमुळे फार वाईट वाटतेय आणि आतमधल्या आतमधे कोंडल्यासारखे वाटतेय तर याबद्दल एखाद्या तुमच्या खास व्यक्तीशी बोला. काही वेळेस आपल्या भावना शेअर केल्यानंतर आपले मन हलके होते.

 


हेही वाचा: Wedding Tips: लग्नानंतर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini