घरमहाराष्ट्रबाबरी पाडणारे शिवसैनिक नव्हे तर हिंदू; बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर- चंद्रकांत पाटील

बाबरी पाडणारे शिवसैनिक नव्हे तर हिंदू; बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर- चंद्रकांत पाटील

Subscribe

बाबरी मस्जिद पाडणारे शिवसैनिक नव्हते. त्यावेळी बाबरी पाडणारे सगळे हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्त्वाखाली काम करत होते. त्यामुळे त्यावेळी कोणीही पक्षाचे नव्हते. शिवसैनिक म्हणून शिवसेनच्या लोकांनी बाबरी पाडली नाही. तसंच, बाळासाहेबांबाबत माझ्या मनात आदरच आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांबदद्ल केलेल्य़ा वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, बाबरी मस्जिद पाडणारे शिवसैनिक नव्हते. त्यावेळी बाबरी पाडणारे सगळे हे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्त्वाखाली काम करत होते. त्यामुळे त्यावेळी कोणीही पक्षाचे नव्हते. शिवसैनिक म्हणून शिवसेनच्या लोकांनी बाबरी पाडली नाही. तसंच, बाळासाहेबांबाबत माझ्या मनात आदरच आहे. त्यांच्यामुळेच आज हिंदू जीवंत आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे पाटील यावेळी म्हणाले. तसेच, याबाबत मी स्वत: उद्धव ठाकरेंना फोन करणार असल्याचे पाटलांनी सांगितले. BJP leader Chandrakant Patil clear his stand on Balasaheb Thackeray Statement

पाटील म्हणाले की, विषय अयोध्येचा होता. माझ्या मनात त्यांच्याबद्दल ऋण. बाबरी ढाचा पाडण्याचा म्हणजे अयोध्येत राम जन्मभूमी आहे, ते प्रस्थापित करण्याचे आंदोलन 83 पासून विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्त्वात सुरु झालं. बजरंग दल, दुर्गावाहिनी या संघटनांनी केलं दोन वेळा अशा प्रकारची अयोध्येच्या दिशेने कूच झाली. प्रत्यक्ष ढाचा पाडताना, सगळे हिंदू होते. आनंद दिघे यांनी अयोध्या मंदिर होण्यासाठी सोन्याची वीट पाठवली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी श्रेय घेतलेचं होते. चुकूनही बाळासाहेब ठाकरेंबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील दिले आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही

चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, बाळासाहेबांचा अवमान हे मी सहन करणार नाही. मी या मुलाखतीत बाळासाहेबांबाबत आदरपूर्वक आणि चांगलच बोललो आहे. ते मात्र दाखवलं नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ केवळ एवढाच होता की, ढाचा पाडणारे हे शिवसैनिक नव्हते. तर सर्व हिंदू होते.त्यावेळी कोणीही पक्ष म्हणून आले नव्हते. सर्व जण विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्त्वाखाली एकत्र आले होते. यात बाळासाहेबांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता. माझा प्रश्न इतकाच होता की त्यावेळी संजय राऊत कुठे होते?

( हेही वाचा: पाटलांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राजीनामा द्या; मुख्यमंत्री शिंदेंना राऊतांचा खोचक सल्ला )

- Advertisement -

उद्धव ठाकरेंवर टिपण्णी करणार नाही

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर प्रश्न विचारला असता, पाटील म्हणाले की, मी मुंबईचा आहे. एक मुंबईकर म्हणून बाळासाहेबांबात मला आदरच आहे. त्यांनी हिंदूंसाठी खूप काम केलं. माझं मातोश्रीशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले यावर मी बोलणार नाही. त्यांना फोन करुन त्यांचा गैरसमज दूर करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -