Wednesday, May 1, 2024
घरमानिनीKairi Chutney: तिखट गोड कैरीची चटणी,जाणून घ्या साहित्य आणि कृती

Kairi Chutney: तिखट गोड कैरीची चटणी,जाणून घ्या साहित्य आणि कृती

Subscribe

वरण-भातासोबत तोंडी लावायला कैरीची चटणी हा उत्तम पदार्थ आहे.

कैरीच नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटत. तसेच कैरीची चटणी ही भाकरी,चपाती कशा सोबत पण एकदम भारी लागते. अशातच बाजारात कैऱ्यांची आवाक् सुरू झाली की घरातही कैरीपासून तयार होणाऱ्या पदार्थांची रेलचेल वाढते. सारखं तेच तेच खाऊन आपल्याला नेहमी कंटाळा येतो अशावेळी वेगळं काय तरी चवदार हे आपल्याला हवंच असतं. अशावेळी दुपारच्या जेवणाची लज्जत वाढवायची असेल तर जेवणासोबत कैरीची चटणी ट्राय करायला विसरू नका.
Kairi Takku and Chutney - Marathi Recipe | Madhura's Recipe
सााहित्य-
  • सर्वप्रथम एक कैरी घ्या ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
  • यानंतर चटणी साठी एक कांदा, दीड ते दोन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ घ्या.
  • फोडणीसाठी अर्धा पळी तेल कढईत घ्या,तेल गरम झाल्यावर
  • एक चमचा बारीक मोहरी टाका
  • आणि मग अर्धा चमचा हिंग
  • ४-५ कडीपत्त्याची पान
Andhra style Raw Mango Chutney | Raw Mango Chutney - Vanita's Corner
कृती-
  • सर्वप्रथम कैरी आणि कांदा एकत्र बारीक किसून घ्या.
  • नंतर या दोघांचा कीस दाबून त्यातील पाणी काढून टाका.
  • आता एका भांड्यात किसलेले कैरी आणि कांदा, लाल तिखट, हळद, साखर आणि मीठ घेऊन एकजीव करा.
  • यानंतर कढईत गरम तेल करत ठेवा.
  • फोडणीसाठी मोहरी आणि हिंग घ्या.
  • यानंतर वर सांगितलेल्या मिश्रणासोबत हे सगळं एकजीव करून घ्या.
  • एकजीव झाल्यांनतर चटणी ५-१० मिनिटं चांगली शिजू द्या.
  • आता आंबट-गोड-तिखट अशी ही चटपटीत कैरीची चटणी तयार!

- Advertisment -

Manini