Sunday, April 21, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : महिलांसाठी खास टिप्स

Kitchen Tips : महिलांसाठी खास टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

14 Faces you make when someone else cooks in your kitchen

- Advertisement -
  • साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे.
  • साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.
  • अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात.
  • फरसबी, मटारचे दाणे, भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या. यामुळे रंग हिरवागार राहतो.
  • लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या. नंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

Redditors Share The 'Chefy' Techniques Home Cooks Should Know

  • पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो.
  • गरम तव्यावर थालिपीठ थापता येत नसेल तर म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालिपीठ तव्यावर टाकावे.
  • सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.
  • बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते.
  • कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते.

हेही वाचा :

Kitchen Tips : 10 मानिनी टिप्स

- Advertisment -

Manini