घरलाईफस्टाईलFood Tips : मसाल्यात भेसळ तर नाही ना? असे ओळखा

Food Tips : मसाल्यात भेसळ तर नाही ना? असे ओळखा

Subscribe

हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असल्यानं एखादा पदार्थ खावा की खाऊ नये? असा भितीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अन्नधान्य, भाज्या, दूध यांसारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. फुड अॅन्ड सप्लाय विभागाच्या माहितीनुसार उघड्यावर विकल्या जाणाऱ्या मसाल्यांची कधीच खरेदी करु नये. कारण त्यांमध्ये धुळीचे कण मिसळले जातात.म्हणूनच आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी खरे आणि नकली मसाले ओळखण्याच्या टिप्स सांगत आहोत.

कशी ओळखावी भेसळ जाणून घ्या : 

हळद पावडरचा रंग आधीपासूनच गडद असतो. मात्र काही वेळेस त्यात रंगाची भेसळ सुद्धा करण्यात येते. शुद्ध हळदीचा रंग हा पिवळा असल्याचे सहज दिसून येतो. तज्ञांच्या मते रंग हा केमिकल पासून बनवला जातो आणि तोच हळदीच्या पावडरमध्ये मिसळला जातो. तुम्हाला भेसळयुक्त हळद तपासून पहायची असल्यास थोडीशी हळद पाण्यात टाकल्यास त्याचा रंग निघून गेल्याचे दिसून येईल.

- Advertisement -

लाल मिरची

लाल मिरची पावडरमध्येही भेसळ केली जाते. दुकानदार लाल मिरची पावडरमध्ये लाल वीट आणि डाय कलर ग्राउंड वापरतात, जे खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. अशावेळी खरी लाल मिरची ओळखण्यासाठी पाण्यात मिसळून पहा. खरी लाल मिरची पाण्यावर तरंगते आणि खोटी लाल मिरची पाण्यात बुडते.

धने

धने पावडरमध्ये व्यापारी भेसळ करण्यासाठी पिठाचा भुसा, जनावरांच्या चाऱ्याचा पेंढा दळून मिक्स करतात. अशावेळी एक ग्लास पाण्यात एक चमचा धने पावडर मिसळा. खरी धने पावडर पाण्यात स्थिर होईल, तर खोटी पावडर पाण्यात तरंगेल. तसंच वास घेऊनही धने पावडर खरी की नकली हे कळू शकते.

- Advertisement -

लवंग

लवंगाचे नैसर्गिक तेल बाजारात उपलब्ध असते. भेसळयुक्त लवंग तपासून पाहण्यासाठी ती पाण्यात टाका. त्यानंतर ती पाण्यावर तरंगल्यास ती शुद्ध नसल्याचे कळेल.

दालचिनी

काही दुकानदार पेरूच्या झाडाची साल दालचिनीमध्ये मिसळतात. खऱ्या दालचिनीची चव गोड असते. तसेच खरी दालचिनी हातावर चोळल्याने तपकिरी रंग जात नाही. याउलट नकली दालचिनी हातावर रंगाची छाप सोडते.

मीठ

सामान्य मीठ आणि आयोडिनयुक्त मीठ ओळखण्यासाठी एक बटाटा  घ्या. बटाटा बरोबर मधोमध कापा. एकीकडे सामान्य मीठ आणि दुसऱ्या कापावर आयोडिनयुक्त मीठ घ्या. त्यावर लिंबूचे काही थेंब मिसळा. 7 ते 10 मिनिटांनंतर त्याचा रंग निळा झाल्यास ते आयोडिनयुक्त मीठ आहे. रंग निळा न झाल्यास ते मीठ सामान्य आहे.

 

हेही वाचा : आईस्क्रिम खाण्याचे जबरदस्त फायदे माहित आहेत का?

________________________________________________________________

Edited By : Nikita shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -