घरलाईफस्टाईलExhaust Fan Cleaning : एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी या टिप्स

Exhaust Fan Cleaning : एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी या टिप्स

Subscribe

एक्झॉस्ट फॅन ही स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे कारण ती स्वयंपाक करताना निर्माण होणारी उष्णता बाहेर टाकण्याचे काम करते.पण एक्झॉस्ट फॅन व्यवस्थित काम करण्यासाठी, तो स्वच्छ ठेवला पाहिजे कारण रोजच्या स्वयंपाक घरातील कामामुळे फॅनमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात जसे की, जर पंखा हळू चालला तर कधी कधी पंखा मधूनच थांबतो. तसेच अस्वच्छ असलेलया फॅनमधून धूर आणि दुर्गंध बाहेर फेकला जात नाही. तेव्हा घरातील एक्झॉस्ट फॅन साफ करण्याचे काही सोपे उपाय आणि ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एग्जॉस्ट फॅनची जाळी कशी स्वच्छ कराल?

एग्जॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गरम पाणी देखील वापरू शकता. गरम पाण्यात अर्धा कप अमोनिया आणि २ चमचे बेकिंग सोडा मिसळून एक सोल्यूशन तयार करून घ्या. नंतर एक कापड या मिश्रणात ओला करून पंखा साफ करून घ्या आणि या कपड्याने पंखा स्वच्छ पुसून घ्या.

- Advertisement -

कॉस्टिक केमिकल्स :

एग्जॉस्ट फॅनवरील चिकटपणा हटवण्यासाठी कॉस्टिक केमिकल्सचा देखील वापर करू शकता. बाजारातून आणलेले हे केमिकल तुम्ही गरम पाण्यात मिसळून एका स्प्रे बाटलीत ओता आणि नंतर पंख्याच्या ब्लेड्सवर स्प्रे करा. तसेच थोड्यावेळाने ब्लेड्स कापडाने स्वच्छ करा.

लिंबू आणि मीठ :

लिंबू आणि मीठाचा वापर करून एक्झॉस्ट फॅन साफ करू शकता. यासाठी एका भांड्यात अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण गरम पाण्यात मिसळा आणि स्वच्छ करा.

- Advertisement -

इनो आणि लिंबू :

एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्यात इनो आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट काही वेळ पंख्यावर घासून ठेवा. मग तुम्ही ते स्वच्छ कापडाने पुसून टाका.

एग्जॉस्ट फॅनच्या पाती कशा साफ कराव्यात?

लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा :

एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांसारख्या पदार्थांचा वापर करून जाळी न काढता मागील बाजूने फॅनची पाती साफ करू शकता. पाणी आणि साबण यांचे मिश्रण तयार करा. फायबर कापड वापरून तुम्ही फॅन पुसून घेऊ शकता. डाग अगदीच चिवट असल्यास 2 चमचे बेकिंग सोडा, लिंबू 1 कप कोमट पाणी असेही मिश्रण तयार करू शकता. तुम्ही हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करू शकता व यानंतर तारेच्या काथ्याने एक्झॉस्ट फॅन ब्लेड घासून स्वच्छ करू शकता. तुमचा पंखा काही वेळात स्वच्छ होईल.

एक्झॉस्ट फॅन घाण होऊ नये म्हणून काय करावे

या सर्व टिप्स व्यतिरिक्त, एक्झॉस्ट फॅनला घाणीपासून वाचवण्यासाठी आठवड्यातून एकदा कपड्याने स्वच्छ करा. असे केल्याने घाण साफ होते.

हेही वाचा : Home Cleaning : घर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरणारे तुरटीचे हॅक्स 

______________________________________________________________________
Edited by : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -