Sunday, May 19, 2024
घरमानिनीRecipeRagi Ladoo : थंडीत मुलांसाठी बनवा नाचणीचे लाडू

Ragi Ladoo : थंडीत मुलांसाठी बनवा नाचणीचे लाडू

Subscribe

थंडी सुरु झाल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. अशावेळी आपल्यापैकी प्रत्येकाला गरम भजी किंवा सुप प्यावेसे वाटते. गृहिणी सुद्धा विविध पदार्थ बनवत असतात. थंडी सुरु झाली की प्रत्येक घरात मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू हमखास बनविले जातात. पण यावेळी तुम्ही पौष्टित नाचणीचे लाडू देखील ट्राय करु शकता.

साहित्य : 
  • 2 कप नाचणीचे पीठ
  • 1 कप साजूक तूप
  • 1 कप पिठी साखर
  • 1/2 कप जाडे पोहे
  • 1/2 चमचे वेलची पूड
  • 2 ते 3 चमचे सुकं खोबरं (किसून भाजलेले)
  • 4 चमचे दूध
  • 3 चमचे बेदाणे, काजू तुकडा, बदामाचे काप
कृती :

Nagli/Ragi Laddu Recipe by Archana's Kitchen

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम तूप कढईत घेउन गरम होवू द्यावे. त्यानंतर त्यात पोहे तळून घ्या आणि लगेच बाहेर काढा नाहीतर ते करपतील.
  • त्यानंतर याच तुपामध्ये नाचणीचे पीठ घालून मंद आचेवर भाजून घ्या.
  • पीठ छान भाजले गेले की त्यात दूध घाला. दुध घातल्यावर पीठ फसफसेल. मग ते ढवळा आणि गॅस बंद करावा.
  • आता हे मिश्रण कोमट झाले की त्यात तळलेले पोहे, भाजलेले सुके खोबरे, वेलची पूड, पिठीसाखर आणि सुकामेवा घालून एकत्र करा आणि त्यानंतर त्याचे लाडू बनवा.

हेही वाचा :

Recipe : पौष्टिक नाचणी-सोयाबीन वडी

- Advertisment -

Manini